ट्रकची हानी : जखमी चालकावर अहेरीत उपचार सुरूएटापल्ली : एटापल्ली-आलापल्ली मार्गावरील येलचील गावाजवळच्या वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावरच उलटल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली आहे. लॉयड मेटल कंपनीतर्फे सुरजागड पहाडावर वाहने नेण्यासाठी रस्ता तयार केला जात आहे. रस्त्याची निर्मिती करताना जे लोहखनिजाचे दगड आढळून येत आहेत. सदर दगड चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे ट्रकने नेले जात आहे. लोहखनिजाची वाहतूक करणारा एमएच ३४-एम ६२१७ या हा ट्रक येलचिल गावाजवळच्या वळणावर उलटला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र वाहनचालक शेख छोटू जखमी झाल्याने त्याच्यावर अहेरी उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र ट्रक क्षतिग्रस्त झाला. रस्त्यावरच ट्रक उलटल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती.
लोहखनिज घेऊन जाणारा ट्रक उलटला
By admin | Updated: April 16, 2016 01:01 IST