शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

वैकल्पिक वादांचे निवारण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:02 IST

वैकल्पिक वाद निवारण पद्धती व त्यापासून होणारे फायदे तसेच मानवाचे मूलभूत अधिकार व जतनेचे कर्तव्य यावर मार्गदर्शन करून वैैकल्पिक निवारण पद्धती व त्यापासून होणारे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन चामोर्शीचे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)......

ठळक मुद्देदिवाणी न्यायाधीशांचे प्रतिपादन : चामोर्शी येथे कायदेविषयक शिक्षण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : वैकल्पिक वाद निवारण पद्धती व त्यापासून होणारे फायदे तसेच मानवाचे मूलभूत अधिकार व जतनेचे कर्तव्य यावर मार्गदर्शन करून वैैकल्पिक निवारण पद्धती व त्यापासून होणारे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन चामोर्शीचे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष एम. झेड. ए. ए. क्यू. कुरैशी यांनी केले.तालुका विधीसेवा समिती चामोर्शीच्या वतीने मंगळवारी स्थानिक केवळराम हरडे कृषी महाविद्यालयात वैकल्पिक वाद निवारण पद्धती व त्याचे फायदे, मूलभूत अधिकार व नागरिकांचे कर्तव्य, समान न्याय व मोफत विधीसेवा या विषयावर कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमाला सह दिवाणी न्यायाधीश एल. डी. कोरडे, अ‍ॅड. अनंत उंदीरवाडे, तालुका वकील संघाचे अ‍ॅड. के. टी. सातपुते, सचिव अ‍ॅड. एम. डी. सहारे, प्राचार्य डॉ. दिनेश सुर्जे उपस्थित होते.दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मूलभूत अधिकार तसेच व्यसनांचे दुष्परिणाम यासह विविध बाबींवर मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी म. मा. पुणेकर, पी. डी. कोसारे, व्ही. पी. गांगरेड्डीवार, संतोष चलाख व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.