शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

सहलीतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रूंदावल्या

By admin | Updated: June 4, 2015 01:37 IST

महाराष्ट्र पोलिसांच्या ‘आपला महाराष्ट्र’ या सुवर्ण जयंती सहल योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील ...

पोलीस विभागाचा उपक्रम : विविध स्थळांना भेटी देऊन घेतली माहितीगडचिरोली : महाराष्ट्र पोलिसांच्या ‘आपला महाराष्ट्र’ या सुवर्ण जयंती सहल योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन घडले. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आदींसह इतर महत्त्वाच्या शहरांना भेटी देऊन तेथील महत्त्वाच्या वास्तू पाहिल्या. यातून नक्षलग्रस्त भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या असल्याचे दिसून येते.आपला महाराष्ट्र सहलीच्या शेवटच्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनी नागपूर शहरातील विविध स्थळांना भेटी देऊन शैक्षणिक, औद्योगिक विकासाची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे सुरू असलेल्या या सहलीच्या उपक्रमाचा हा नववा टप्पा होता. नवव्या टप्प्यातील सहलीत जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील ४१ मुली व ३६ मुले असे एकूण ७७ विद्यार्थी सहभागी झाले होते. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात २३ मे २०१५ रोजी सदर सहल गडचिरोली येथून रवाना करण्यात आली होती. नागपूर सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी शहरातील दीक्षाभूमी, बुट्टीबोरी येथील आईस्क्रीम फॅक्टरी, अंबाझरी उद्यान व क्रेझी कॅसल वॉटर पार्क आदी स्थळांना भेटी देऊन त्याची माहिती जाणून घेतली. त्यापूर्वी सहलीतील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील विधानसभवन, मंत्रालय, पोलीस महासंचालक कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, बांद्रा, जहु चौपाटी, गेट वे आॅफ इंडिया, ताज हॉटेल, एलिफंटा केव्हस, गिरगाव चौपाटी आदी स्थळांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पुणे येथील हिंजवडी, आगाखान पॅलेस, पुणे विद्यापीठ, भांडारकर संस्था, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शनिवारवाडा, लाल महाल, सिंहगड किल्ला, खडकवासला धरण, कात्रज सर्पोद्यान, सारसबाग आदी ठिकाणी भेटी दिल्या. तसेच औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अजिंठा वेरूळ लेणी आदी ठिकाणी भेटी देऊन तेथील सौंदर्य न्याहाळले.नागपूर येथील सहलीच्या यशस्वीतेसाठी नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा सहपोलीस आयुक्त राजवर्धन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य महेश चव्हाण, नक्षल विरोधी अभियानाचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, अशोक रूपनारायण, पोलीस उपनिरीक्षक संजय खंडारे, यशोदा कणसे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)