शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अस्थायी पट्टेधारकांचे तिप्पट अतिक्रमण

By admin | Updated: May 8, 2017 01:20 IST

देसाईगंज येथे राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट अतिक्रमण केले आहे.

भूमिअभिलेखच्या मूळ नकाशावरून झाले स्पष्ट : कार्यकारी अभियंत्याची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : देसाईगंज येथे राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट अतिक्रमण केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग अक्षरश: अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. मंजूर जागेपेक्षा करण्याात आलेले तिप्पट अतिक्रमण आधी काढण्यात यावे, त्यानंतर आम्ही आमचे अतिक्रमण स्वत:हून काढून घेणार, अशी ताठर भूमिका लहान तात्पुरत्या अतिक्रमणधारकांवर घेतली असल्याने राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहे. देसाईगंज नझूल शहरातील बाजार उपविभागातील खसरा क्रमांक २२/८० प्रकरण क्रमांक २ नुसार १७ मार्च १९५१ ला १५ बाय १२ असे एकूण १८० चौ.फुट चौरस मीटर क्षेत्रफळाचे १९ अस्थायी पट्टे व्यावसायिक प्रयोजनार्थ देण्यात आले होते. सदर अस्थायी पट्टे सन १९५०-५१ ते १९६०-६१ या दहा वर्षाच्या मुदतीकरिता अस्थायी स्वरूपात देण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट जागेत अतिक्रमण केलेले आहे. यामध्ये मजूर खसरा क्रमांक २२/८० मधील प्लाट क्रमांक ४१, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९, ५०, ५१ आदींचा समावेश आहे. १९ पैकी ११ अस्थायी पट्टेधारकांनी येथे तिप्पट अतिक्रमण केले आहे. वर्षभरापूर्वी साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी, आष्टी-आलापल्ली-रेकनपल्ली-सिरोंचा या नवघोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याबाबत सहायक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी देसाईगंज शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगतच्या ११ अस्थायी पट्टेधारकांनाही राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण केल्याने २४ एप्रिलला नोटीस बजावली असून आधी या अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट केलेले अतिक्रमण काढून राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत आहे. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांच्या हाती रस्त्याचा मूळ नकाशाच लागला असून अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट अतिक्रमण केल्याची बाब उघडकीस आली आहे. छोट्या पण अस्थायी अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर मोठ मोठी इमारत बांधून अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या नझूलच्या अस्थायी पट्टेधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाप्रमाणे आपले अतिक्रमण कधीही काढल्या जाऊ शकते. या भितीने शहरातील अस्थायी अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. अतिक्रमण निष्कासीत केले जाणार सहायक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी २४ एप्रिलच्या नोटीसनुसार देसाईगंज शहरातील मूख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सीच्या राजमार्गच्या जमिनीवर किमी ६३/४०० वर उजव्या/डाव्या बाजूस ३ बाय ३ मी एवढ्या जागेवर अनधिकृतरित्या अतिक्रमण करून कब्जा केल्याने अतिक्रमण धारकांना उत्तरवादी ठरवून नोटीस प्राप्त झाल्यापासून २९ एप्रिलच्या आत अनधिकृत कब्जा हटवावा, अशी सूचना देऊन नोटीस तामिल झाल्यापासून तीन दिवसाच्या आत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग क्रमांक १४ नागपूर येथे जागेबाबत अधिकृत कागदपत्रांसह अभिवेदन करण्याची संधी देण्यात आलेली होती. अशा अभिवेदनधारकांना २९ एप्रिलला पूर्ण सुनावणी झाली. या नोटीसचे अनुपालन करण्यात अतिक्रमणधारक अयशस्वी ठरल्याने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी व यातायात) अधिनियम २००२ ची कलम २६ ची उपकलम (२) नुसार शास्ती लादून अतिक्रमण निष्काशीत केले जाणार असल्याची माहिती आहे. नोटीस प्राप्त झालेल्या एकाही अतिक्रमणधारकाने नागपूरच्या विभागीय कार्यालयात हजेरी लावली नाही. देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गावरील अतिक्रमणधारकांना राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. अतिक्रमण केलेली बहुतांश जमीन नझूल विभागाची असल्याने नझूल विभागाकडून मूळ नकाशा घेतलेला आहे. अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमण सर्व प्रथम काढल्या जाईल. त्यानंतर आपला मोर्चा इतर अतिक्रमणधाकरंकडे वळविल्या जाईल. महामार्गाच्या निर्मितीसाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. - नरेश लभाने, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, भंडारा