शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

By admin | Updated: July 30, 2015 01:23 IST

धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे अणुशास्त्रज्ञ, ..

मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना : शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयात कार्यक्रमगडचिरोली : धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे अणुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले. मंगळवारी या महान नेत्याला गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, गडचिरोली - माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व केरळचे माजी राज्यपाल रा. सु. गवई यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. कलाम व रा. सु. गवई यांच्या प्रतिमेला हार व फुले अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, पंकज गुड्डेवार, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, समशेर खॉ पठाण, काशिनाथ भडके, नंदू वाईलकर, अमिता मडावी, पी. टी. मसराम, रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, बालू मडावी, गौरव कुळमेथे, सुरेश परचाके, विनायक वाढीवा व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. कलाम यांच्या निधनाने देशाने प्रभावशाली व्यक्तिमत्त्व गमावला, अशी प्रतिक्रिया जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे यांनी व्यक्त केली. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अहेरी - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन झाल्याने अहेरी पाणीपुरवठा उपविभागाच्या वतीने त्यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कनिष्ठ अभियंता अश्विन झाडे, कनिष्ठ अभियंता अमोल रामटेके, प्रवीण झाडे, पंकज मेश्राम, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार देवानंद सुरपाम उपस्थित होते. वसंत विद्यालय, गडचिरोली - स्थानिक वसंत विद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक एस. व्ही. लाकडे, शिक्षक कुमरे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, आरमोरी - माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गोविंद राजन कवंडर, विभागप्रमुख विजयालक्ष्मी कवंडर, मुख्याध्यापक केशवन कवंडर, निर्मला भोसले, हर्षराज सहारे, निर्मला नेऊलकर, शारदा मेंघरे, प्रभा मोटघरे, झासी इंदूरकर, माधुरी भोयर, सिंधू म्हशाखेत्री, कुमता घोडेस्वार, एन. एन. मालाकर, सुजाता मेहर, मिनाज शेख, तेजेश्वर भोयर, रवीकांत म्हस्के, सरिता सातपुते, किरण रामटेके, नईमा पठाण, राधिका बेहरे, देबरथ मंडल, रतनराज खोब्रागडे, पुष्पा कुंभारे, दाळींबा उंदीरवाडे, शालू बारापात्रे अनिता कोल्हे, रत्ना खापर्डे उपस्थित होत्या.लिटिल फ्लॉवर स्कूल, वसाचक - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना शाळेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य फादर कुरीयन, एन्जकसी, फ्रिन्सी, दीपाली झोडगे, मीनाक्षी सुरनकर, ममता बांबोळे, मनोज भानारकर, रवींद्र सेलोटे, एकनाथ खोबरे उपस्थित होते.राजे धर्मराव कला, वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा - माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य प्रकाश मेश्राम, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पोटेगाव - माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक जी. सी. खांडवाये, सुधीर शेंडे, एस. एल. पडवेकर, ए. डब्ल्यू. बोरकर, नलिनी कुमरे, बी. डी. वाळके, के. जी. भोसरे, व्ही. एम. बनगीनवार, के. जी. गेडाम, व्ही. एम. नैताम, व्ही. एस. देसू, एम. जी. वासेकर उपस्थित होते. डॉ. कलाम यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली - श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. जे. गावंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. इन्कणे, प्रा. साखरे, प्रा. दुर्गम, प्रा. कोयलवार, गडसुलवार, चंद्रकांत शेटे, वाटेकर, प्रवीण कांबळे, विनोद रोहणकर, राकेश संतोषवार उपस्थित होते. संजीवनी प्राथमिक शाळा, विवेकानंदनगर, गडचिरोली - माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सचिन भुरसे होते. यावेळी दोन मिनीटे मौन पाळून डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली. संचालन पवन संतोषवार तर आभार शुभांगी रामटेके यांनी मानले.