शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:52 IST

ज्या भागात ५० टक्केपेक्षा जास्त आदिवासी समाज आहे, त्या भागात दार्जिलिंगप्रमाणे स्वतंत्र कायदा असला पाहिजे.

ठळक मुद्देबाळासाहेब आंबेडकर यांचे प्रतिपादन : कोरची येथे आदिवासी दिन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : ज्या भागात ५० टक्केपेक्षा जास्त आदिवासी समाज आहे, त्या भागात दार्जिलिंगप्रमाणे स्वतंत्र कायदा असला पाहिजे. हा कायदा झाल्याशिवाय येथील नागरिकांचा विकास होणार नाही, असे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.कोरची येथील राजीव भवनात जागतिक मूलनिवासी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी नांदेड येथील प्रा. डॉ. मेघराज कपूर होते. प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. योगीता खानोरकर, प्रभू राजगडकर, रोहिदास राऊत, अ‍ॅड. श्रावण ताराम, डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. महेश कोपुलवार, शुभदा देशमुख, कोरचीच्या तहसीलदार पुष्पलता कुमरे, सभापती कचरीबाई काटेंगे, डॉ. नंदेश्वर, हंसराज बडोेले, युवा जिल्हाध्यक्ष टेंभूर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना बाळासाहेब म्हणाले, घटनेत तरतूद असल्यानुसार ज्या भागात अर्ध्यापेक्षा अधिक लोक एक बोलीभाषेचे असतील, त्यांची राहणी, त्यांची जगण्याची पद्धत, त्यांचे रितीरिवाज इतरांपेक्षा भिन्न असतील तर त्या भागात स्वायतत्ता प्रस्थापित करणे हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. एकदा स्वायतत्ता प्रस्थापित झाली की, त्या परिसरातील जल, जंगल, जमीन व इतर संसाधन, साधनसामग्रीवर त्यांचा अधिकार असतो. या परिसरातील लोह खनिजाचा प्रश्न असो की, इतर प्रश्न असोत, सरकारकडे विनवणी करावी लागते. मोठमोठे आंदोलने उभारावी लागतात. एकंदरितच स्वत:च्याच अधिकारांसाठी संघर्ष करण्याची वेळ आदिवासींवर येते. आंदोलनासाठी खूप मोठे मनुष्यबळ व पैशाची गरज असते. एवढा पैसा आदिवासी समाजाकडे राहत नाही. त्यामुळे ते आंदोलनही करू शकत नाही. परिणामी शासन किंवा इतर संस्थांकडून अन्याय झाल्यास तो निमूटपणे सहन करावा लागतोे.खोट्या आदिवासींनी खºया आदिवासींच्या सुमारे १ लाख ३२ हजार नोकºया हडपल्या आहेत. आरक्षण संपविले जात आहे. या गंभीर प्रश्नांवर केवळ चर्चा नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. आदिवासी पट्ट्यात खनिज संपत्ती असल्याने या भूभागावर अनेकांचे लक्ष आहे. त्यामुळे आदिवासींनी सावध असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या अ‍ॅड. योगीता खानोरकर, प्रभू राजगडकर, प्रा. डॉ. मेघराज कपूर, डॉ. महेश कोपुलवार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तहसीलदार पुष्पलता कुमरे यांचा आदिवासीबांधवांकडून सत्कार करण्यात आला. दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसभेच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले. प्रास्ताविक इजामसाय काटेंगे, प्रा. विनोद कोरेटी तर आभार बाबुराव मडावी यांनी मानले.