शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सातबारावरील जातीची नोंद वगळण्याला आदिवासींचाच विरोध; हक्क डावलण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 20:30 IST

Gadchiroli News सातबारावरील जातीची नोंद वगळल्यास आदिवासींचे हक्क डावलले जातील, अशी भीती आदिवासींना वाटत आहे.

ठळक मुद्देहा निर्णय खऱ्या आदिवासी समाजाला मारक व घातक असल्याचे आदिवासी समाजाच्या संघटनांचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आदिवासींना आपली जात सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा महसुली पुरावा म्हणजे सातबारावरील जातीची नोंद आहे. त्या आधारे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र आदिवासींना उपलब्ध होते. या दस्तावेजातील जात वगळल्यास आदिवासींचे हक्क डावलले जातील, अशी भीती समाजाला वाटत आहे. (Tribal opposition to omission of caste record on Satbara; Fear of losing rights)

जातीवाचक वस्ती, पाडे व गावांची नावे बदलविण्यात आल्यानंतर आता सातबाराच्या उताऱ्यामधील जातीवाचक नावांची नोंदणी पुसण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात महसूल व वनविभाग यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. ७/१२ च्या उताऱ्यातील एका कॉलममध्ये शेतीचे स्थानिक नाव हे जातीवाचक नोंदविले जायचे.

राज्य सरकारने सामाजिक सौहार्द व सलोखा स्थापन व्हावा या हेतूने वस्ती पाडे व आता सातबारावरील जातीवाचक नावे वगळण्याचा निर्णय घेतला.  आदिवासी समाज हा पूर्वीपासून अशिक्षित राहिलेला समाज आहे. जातीचे दाखले, वैधता प्रमाणपत्र इत्यादी शासकीय कागदपत्रे तयार करण्यासाठी त्यांना महसुली जातीची नोंद असलेले शासकीय पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. यावरील जातीची नोंद वगळण्यात आली तर लाखो आदिवासी जनता जाती प्रमाणपत्र पयार्याने शासकीय सोयी सवलतीपासून वंचित राहील.

 काय नुकसान होणार?

१) ही नोंद काढल्यास आदिवासींच्या जमिनीचे घोटाळे होतील. जमीन हस्तांतरण कायद्यान्वये आदिवासींच्या जमिनी इतरांना विकता येत नाही. सातबारावरून जातीची नोंद पुसून टाकल्यास भूमाफियांकडून आदिवासींच्या जमिनीही सहज विक्री करता येईल.

२) आदिवासींना वनजमिनीचे पट्टे वाटपासाठी विभागाकडून महसुली पुरावा मागितला जातो. महसुली पुरावा म्हणून सातबारा जोडण्यात येतो. कारण त्यात जातीची नोंद असते. या दस्तावेजातून जात पुसल्या गेल्यास आदिवासींचे हक्क डावलले जातील.

- आधीच लाखो बोगस आदिवासींनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या बळकावल्या. आता नोंद नसेल तर लाखोंचा बोगस जातीचा लोंढा आदिवासीमध्ये घुसेल. ज्यांना आपल्या जातीवर गर्व, अभिमान नसेल अशांसाठी तो निर्णय खुशाल लावावा मात्र आदिवासी समाजाचे नुकसान करणारा हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.

दिनेश शेराम, अध्यक्ष, अ.भा. आदिवासी विकास परिषद

 

- आदिवासींचे हक्क हिरावतील

जातवैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समिती महसुली पुरावा सातबाराचा महत्त्वाचा पुरावा ग्राह्य धरते. २००५ मध्ये माना जातीच्या न्याय निवाड्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हेच पुरावे ग्राह्य धरले. महाराष्ट्र रिस्टोरेशन शेड्यूल ट्राईब ॲक्ट १९७४ अन्वये आदिवासींना त्यांच्या जमिनी परत व्हायच्या. कारण सातबारावर जातीची नोंद रहायची. त्या नोंदीच काढल्या तर आदिवासींची जमीन कुणालाही विकता येईल. कायद्याच्या बाबतीत असो की आदिवासींना प्रमाणपत्रासाठी हा पुरावा महत्त्वाचा समजल्या जातो.

ॲड. विकास कुळसंगे, मुख्य संयोजक, महाराष्ट्र राज्य आदिवासी वकील संघटना

टॅग्स :Governmentसरकार