शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

समिती ठरविणार आदिवासी अध्यासन केंद्राचा अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:27 IST

स्थानिक गोंडवाना विद्यापीठातर्फे गोंडवाना आदिवासी अध्यासन केंद्र निर्माण करण्यात आले असून या केंद्रांतर्गत विद्यापीठस्तरावर कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिठीची पहिली बैठक २१ डिसेंबर रोजी शुक्रवारला प्र-कुलगुरू यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२१ ला पहिली बैठक : कला, साहित्य व गोंडी भाषेचा अभ्यास होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठातर्फे गोंडवाना आदिवासी अध्यासन केंद्र निर्माण करण्यात आले असून या केंद्रांतर्गत विद्यापीठस्तरावर कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिठीची पहिली बैठक २१ डिसेंबर रोजी शुक्रवारला प्र-कुलगुरू यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेची द्वितीय सभा १५ नोव्हेंबर २०१८ रोजी पार पडली. यासभेमध्ये अधिसभा सदस्यांनी गोंडवाना आदिवासी अध्यासन केंद्रांतर्गत आदिवासी कला साहित्य गोंडी भाषेचा अभ्यास करण्याबाबत सुचित केले. या संदर्भाचा ठराव प्रा. रमेश हलामी यांनी अधिसभेत मांडला. त्यानुसार हा ठराव पारित करण्यात आला. आता गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी कला, साहित्य, गोंडीभाषा आणि तत्सम बाबीचा सर्वंकष अभ्यास करून या संदर्भाचा प्रस्ताव तयार करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने सदर समितीची सभा २१ डिसेंबर रोजी विद्यापीठात होणार आहे. ही समिती अध्यासन केंद्राच्या अभ्यासक्रमात कोणत्या गोष्टींचा समावेश राहणार हे ठरविले.या समितीचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. सी. व्ही. भुसारी आहेत. सदस्यांमध्ये अहेरीच्या राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. रमेश हलामी, डीआरडीएचे माजी प्रकल्प संचालक प्रभू राजगडकर, जनता महाविद्यालय चंद्रपूरचे प्रा. डॉ. योगेश्वर दुधपचारे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर आदींचा समावेश असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी सांगितले.