शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी सहकारी संस्थाच्या घटीतील तूट माफ होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:45 IST

शासकीय हमीभावानुसार शेतकऱ्यांकडील धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे सबएजंट म्हणून काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या धान भरडाईतील घटीमुळे आलेली जवळपास दिडशे कोटी रुपयांची तूट अखेर माफ होण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देआठ वर्षांपासून अडले कमिशन : ३० ला मंत्रालयात संयुक्त बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासकीय हमीभावानुसार शेतकऱ्यांकडील धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे सबएजंट म्हणून काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या धान भरडाईतील घटीमुळे आलेली जवळपास दिडशे कोटी रुपयांची तूट अखेर माफ होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विषयावर तोडगा काढण्यासाठी येत्या ३० आॅक्टोबरला मंत्रालयात बैठक होणार आहे.आदिवासी सहकारी संस्थांच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला धान पुरेशा गोदामाअभावी उघड्यावरच ठेवला जातो. २००९-१० आणि २०१०-११ मध्ये खरेदी केलेल्या धानाची वेळेवर भरडाईच झाली नाही. राईस मिलर्सनी वाहतूक दर परवडत नसल्याचे सांगत धानाची उचल करून भरडाई करण्यास नकार दिला होता. परिणामी उघड्यावरील धान दोन वर्षात बऱ्याच प्रमाणात सडून गेला. त्यामुळे भरडाईतील घट वाढली. या घटीतील तूट संबंधित सहकारी संस्थांच्या कमिशनमधून भरून काढण्याचे ठरवून आदिवासी विकास महामंडळाने त्यांचे कमिशन आतापर्यंत अडवून ठेवले. दरम्यान धानातील तुटीसाठी आ.वि.सहकारी संस्थांना जबाबदार धरू नये, असे सांगत संबंधित संस्थांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला. परिणामी हा विषय गेल्या ७ ते ८ वर्षांपासून रेंगाळत पडला आहे.यावर्षी हा विषय निकाली काढून आमचे कमिशन दिले नाही तर धान खरेदी केंद्र घेणारच नाही, अशी भूमिका अनेक पूर्व विदर्भातील सहकारी संस्थांनी घेतली. त्यामुळे येत्या ३० आॅक्टोबरला आदिवासी विकास विभाग आणि अन्न-नागरी पुरवठा विभागाची संयुक्त बैठक घेऊन आदिवासी वि.का.सहकारी संस्थांकडून वसूल करण्यासाठी प्रस्तावित असलेली धानाच्या घटीतील तुटीची रक्कम माफ करून त्यांचे प्रलंबित कमिशन देण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.