शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांनी संघटित होण्याची गरज

By admin | Updated: October 25, 2015 01:12 IST

घोटच्या ऐतिहासिक स्थळावर स्मारक बनविणे व अनुसंधान केंद्र बनविणे ही एक भाग्याची गोष्ट आहे.

घोट येथे जनजागरण मेळावा : अम्ब्रीशराव आत्राम यांचे प्रतिपादनघोट : घोटच्या ऐतिहासिक स्थळावर स्मारक बनविणे व अनुसंधान केंद्र बनविणे ही एक भाग्याची गोष्ट आहे. अनुसंधान केंद्र जनजागृतीचे प्रभावी साधन ठरू शकते. यातून आदिवासी समाजबांधव एकत्र येतील. नव्हे त्यांना एकत्र येण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. घोट येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना, घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार, प्रकाश गेडाम, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, चामोर्शी पं.स.च्या उपसभापती मंदा दुधबावरे, प्रमोद पिपरे, प्रा. डी. के. मेश्राम, रवींद्र ओल्लालवार आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री आत्राम म्हणाले, आदिवासी समाजाच्या विकासासाठी आदिवासी समाज बांधवांनी संघटीत होणे काळाची गरज आहे. याकरिता आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरावी. शहीद वीर बाबुराव शेडमाके यांची गडचिरोली ही एक पावनभूमी आहे. आदिवासी समाजाचे आपणा सर्वांना रक्षण करावयाचे आहे. घोट तालुका निर्मितीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विद्यमान राज्य सरकार सदर प्रश्न मार्गी लावेल. या परिसरातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील आम्ही भाजपचे लोकप्रतिनिधी जोरकस प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी दिली.खासदार अशोक नेते म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने व त्यांच्या लोकप्रतिनिधींनी गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष केले. शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक यापूर्वीच व्हायला पाहिजे होते. मात्र तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे ते होऊ शकले नाही. विद्यमान राज्य सरकारच्या काळात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.आमदार डॉ. देवराव होळी यांनी घोट परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाश गेडाम लिखीत वीर बाबुराव पुलसुरबापू शेडमाके या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पोरेड्डीवार, संचालन रमेश भुरसे यांनी केले तर आभार धर्मराज ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला विलास गण्यारपवार, परशुराम दुधबावरे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)