शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

वाघांच्या दहशतीने पहाटे फिरायला जाणाऱ्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

हिवाळा हा आरोग्यासाठी शक्तीवर्धक ऋतू मानला जातो. पहाटेच्या गुलाबी थंडीत शारीरिक कसरत करण्याचे अनेक फायदे असल्याने सूर्य उगवण्यापूर्वी धानोरा, चामोर्शी, आरमोरी मार्गावर नागरिकांची रांग लागते. काही नागरिक तर पहाटेलाच घराबाहेर पडत होते. मात्र यावर्षी वाघांनी फिरणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये दहशत निर्माण करून ठेवली आहे.

ठळक मुद्देबंदोबस्त करा । चारही मार्गांवरील गर्दी ओसरली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : थंडीची चाहूल लागताच पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते. गडचिरोली शहरात चामोर्शी मार्ग, आरमोरी मार्ग, धानोरा मार्ग हे फिरायला जाणाऱ्या नागरिकांची आवडती ठिकाणे आहेत. मात्र पावसाळ्यापासून वाघांची दहशत असल्याने फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमालीची घटली आहे.हिवाळा हा आरोग्यासाठी शक्तीवर्धक ऋतू मानला जातो. पहाटेच्या गुलाबी थंडीत शारीरिक कसरत करण्याचे अनेक फायदे असल्याने सूर्य उगवण्यापूर्वी धानोरा, चामोर्शी, आरमोरी मार्गावर नागरिकांची रांग लागते. काही नागरिक तर पहाटेलाच घराबाहेर पडत होते. मात्र यावर्षी वाघांनी फिरणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये दहशत निर्माण करून ठेवली आहे. गडचिरोली शहराच्या जवळ असलेल्या कोटगूल, पुलखल, मुडझा, वाकडी परिसरात वाघाचे अधूनमधून दर्शन होत आहे. गडचिरोली शहराला जंगल लागून आहे. विशेष करून पोटेगाव व चामोर्शी मार्गालगत झुडपी जंगल आहे. वाघ असल्याने नागरिकांनी शक्यतो रात्री किंवा एकटे जाऊ नये, असे आवाहन वनविभागामार्फत केले आहे. काही नागरिक पहाटेला फिरायला जातात. मात्र त्यांच्या मनात वाघाची भिती कायम आहे. त्यामुळे मनमोकळेपणाने फिरण्याच्या आनंदावर विरजन पडले आहे. आजपर्यंत गडचिरोली शहरातील एकाही व्यक्तीवर सुदैवाने वाघाने हल्ला केला नाही. मात्र वाघाची भिती नागरिकांच्या मनात कायमची कोरली आहे. अनेकांनी तर वाघाच्या भितीने फिरायला जाणेच सोडून दिले आहे.वाघाच्या भितीने जंगल वाचलेहिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी गडचिरोलीतील नागरिक सरपन खरेदी करतात. त्यामुळे काही मजूर जंगलात जाऊन सरपण आणत होते. यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल तोड होत होती. मात्र वाघाच्या भितीने सरपण आणणे बंद झाल्याने जंगलतोडही थांबली आहे.

टॅग्स :Tigerवाघ