शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेत जमिनीसाठी वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:33 IST

आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोरेगाव कुरंडी बिटात शेत जमिनीसाठी वन क्षेत्रात काही लोक अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करीत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देकोरेगाव बिटमधील प्रकार : रोपवनामुळे वन्यजीवांचा निवारा नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोरेगाव कुरंडी बिटात शेत जमिनीसाठी वन क्षेत्रात काही लोक अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करीत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.जास्त घनतेचा जंगल म्हणून ओळख असलेल्या या भागात वृक्षतोडीमुळे नैैसर्गिकरित्या उभे जंगल आता शेवटच्या घटका मोजत आहे. मागील काही वर्षांपासून वन विभागाने सुरू केलेले रोपवन हे वन्यजीवांसाठी शाप ठरत आहे. ज्या ठिकाणी दाट झुडूपी जंगल आहे. ते जंगल तोडून त्या ठिकाणी मानवीकृत रोपवन तयार केले जात आहे. वन्य प्राण्यांचा वावर झुडूपी जंगलात असतो. रोपवनासाठी झुडूपे, झुडूपी जंगल तोडले जाते. त्यामुळे वन्यप्राणी रस्त्यावर येतात. कुरंडी बिटातील डोंगरतमाशी जंगलात २० हेक्टर क्षेत्रात दाट जंगल तोडून रोपवन तयार करण्यात आले. तेव्हापासून या जंगलातील वन्यजीव सायंकाळच्या सुमारास गावाशेजारी येतात, असे गावकºयांचे म्हणणे आहे. डोंगरालगत असलेल्या जंगलात नेहमी प्राण्यांचा वावर असतो. वन विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे आरमोरी, पोर्ला वन परिक्षेत्रातील डोंगरतमाशी, कोरेगाव, कुकडी, मोहटोला, नरोटी, नरोटी चक या भागात बाहेरील लोकांनी वन जमिनीवर अतिक्रमण केले. जंगलाची तोड करून शेतजमिनी तयार केल्या. यामुळे जंगलाची मोठी हानी झाली.बाहेरच्या भागात राहणाºया ज्या लोकांनी पेसा अंतर्गत क्षेत्रात जमिनी काढल्या त्या परत घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुकडी, विहीरगाव, मोहटोला, नरोटी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्यपालांना निवेदनही पाठविले आहे. मानवीकृत रोपवनाच्या नावाखाली व शेतजमिनी विकसीत करण्याच्या नावावर होत असलेली वृक्षतोड पूर्णत: थांबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग