शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात खर्रा व्यावसायिक अडचणीचे

By admin | Updated: August 12, 2016 00:52 IST

राज्यशासनाने गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. गडचिरोली जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या ...

घोटण्यासाठी मशीनचा आधार : २० रूपयांत एक खर्रा गडचिरोली : राज्यशासनाने गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. गडचिरोली जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावरूनही व्यापक प्रयत्न केले जात आहे. मात्र शहरात दररोज लाखो रूपयांचा खर्रा पानठेल्यांवरून विकला जात असल्याने व्यसनमुक्ती कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात दोन वर्षापूर्वी गुटख्यासोबतच तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधीत सुपारी यावर बंदी घालण्यात आली आहे. पानठेल्यांवर आता काही पानठेले वगळता पान कुठेही मिळत नाही. सरसकट सुपारी व तंबाखुजन्य पदार्थाची (खर्राची) विक्री करण्यात येते. साधारणत: आज २० ते २५ रूपयाला तंबाखुजन्य पदार्थाचा खर्रा गडचिरोली जिल्ह्यात विकला जातो. याचे खास शौकिण आहेत. ते एका दिवसाला दोन ते तीन खर्रे सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत खातात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. एका दिवसात गडचिरोली जिल्ह्यात दोन ते अडीच लाख रूपयाची उलाढाल या व्यवहारात होते. गडचिरोलीत ही बंदी नावालाच उरली असून पोलीस यंत्रणा व अन्न औषध प्रशासन विभाग काहीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. सकाळी मशीनद्वारे हजार ते दीड हजार खर्रे तयार करून त्याच्या पुड्या बांधून थैलीमध्ये शाळकरी मुलांचा वापर करून त्या संबंधिताना पाठविल्या जातात. एका पुडीला किमान २० रूपये किंमत घेण्यात येत आहे. वाटप करणारा हा पोरगा नगदी पैसे घेऊन तासा-दीडतासात सर्व काम फत्ते करतो. भ्रमणध्वनीवर मागणी नोंदविताच अवघ्या १० ते १५ मिनिटात संबंधितांना खर्रा उपलब्ध होतो. त्यामुळे बंदी नावालाच उरली आहे व शाळकरी मुलांना या कामात ओढून त्यांचेही भविष्य खराब करण्याचे काम सुरू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन तंबाखूमुक्ती कार्यक्रमासाठी बैठकावर बैठका घेत असताना शहरासह ग्रामीण भागातही असे चित्र असल्याने व्यसनमुक्ती कार्यक्रम कागदावरच राहण्याची शक्यता आहे. अनेक शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच किंवा कार्यालयाबाहेर तंबाखू, खर्रा सेवन करताना कॉम्प्लेक्स परिसरात दिसून येतात. शाळांमधून लहान मुलांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असले तरी मोठ्या व ज्येष्ठ लोकांच्या प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. अनेक शाळांच्या परिसरातच १०० मीटरपेक्षा कमी अंतरावर पानठेले खर्रा विक्रीचे काम गडचिरोली शहरात करीत आहे. हे पानठेलेही तेथून हटविण्याची गरज आहे, अशी मागणी व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)