शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीला कचऱ्याचा वेढा

By admin | Updated: June 20, 2017 00:44 IST

आरमोरी शहराजवळ रामाळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

दुर्गंधीचा त्रास : आरमोरी नगर पंचायतचे दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहराजवळ रामाळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची तत्काळ विल्हेवाट लावावी, त्याचबरोबर या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी होत आहे.रामाळा नदीघाट रस्त्याच्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत शहरातील बौद्ध बांधव तसेच इतर समाजातील नागरिक दफनविधी करतात. शहरातील कचरा या स्मशानभूमीत टाकण्यात येत असल्याने स्मशानभूमीचा परिसर हा पूूर्णत: कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात अत्यंयात्रेतील नागरिकांना कचऱ्यामुळे दुगंर्धीचा त्रास सहन करावा लागते. मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदणाऱ्यांनासुद्धा दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. नगर पंचायत प्रशासनाने स्मशानभूमीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची उचल करून साफसफाई करावी, याबाबत नगर पंचायत प्रशासनाला अनेकवेळा निवेदन देण्यात आले. मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.नगर पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्मनशानभूमीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची तत्काळ उचल करावी व कचरा टाकणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. तसेच स्मशानभूमी परिसराची साफसफाई करून पाणी, विद्युत व शेडचे बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून अत्यंविधीतील नागरिकांना शोकसभा घेणे सोईचे होईल. स्मशानभूमीतील दुर्गंधीपासून तत्काळ मुक्तता करावी, अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष हसंराज बडोले यांनी दिला आहे. नगर परिषदेचे नियंत्रण न राहिल्यास या ठिकाणाची डम्पींग यार्डप्रमाणे परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच लक्ष देण्याची मागणी आहे.