शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावात शिकारीसाठी सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:24 IST

देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावांमध्ये वन्यजीवांच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांनी सापळे रचले आहेत. वन्यजीवांची शिकार करताना लपून बसण्यासाठी तलावात पाण्याच्या जवळ झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली आहे.

ठळक मुद्देवन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष : पाण्याजवळ तयार केली झाडाच्या फांद्यांची झोपडी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावांमध्ये वन्यजीवांच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांनी सापळे रचले आहेत. वन्यजीवांची शिकार करताना लपून बसण्यासाठी तलावात पाण्याच्या जवळ झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली आहे. या ठिकाणी दरदिवशी एका प्राण्याची शिकार होत असताना या परिसरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.एप्रिल महिन्यापासून जंगलातील पाणवठे आटण्यास सुरूवात झाली आहे. वन विभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले असले तरी या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात नाही. त्यामुळे पाण्यासाठी वन्यजीवांनी गावाजवळ असलेल्या तलावांकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. देसाईगंज तालुकास्थळापासून पूर्वेला अवघ्या आठ किमी अंतरावर शंकरपूर गावाजवळ तलाव आहे. या तलावात वन्यजीवांच्या शिकारीसाठी सायंकाळच्या सुमारास खुलेआम सापळे लावले जात आहेत. त्याचबरोबर डोंगरमेंढा येथेही तलावात सापळे लावले जात आहेत.प्राण्यांना दिसू नये, यासाठी जलसाठ्याजवळच झाडाच्या फांद्यांच्या झोपड्या बांधल्या आहेत. या झोपड्यांमध्ये शिकारी लपून राहतात. वन्यजीव रात्री पाण्यासाठी आल्यानंतर सापळ्यात अडकतो. त्यानंतर शिकारी सदर प्राण्यास मारून त्याच्या मांसाची विक्री करतात. विशेष म्हणजे, तलावाच्या पाळीवर उभे झाले तरी शिकाऱ्यांनी तलावात बांधलेल्या झोपड्या नजरेस पडतात. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मात्र या झोपड्या कशा दिसत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वन विभागाचे कर्मचारी शिकाऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन चूप असल्याचे बोलले जात आहे.वन कर्मचाऱ्यांची जंगल गस्त कागदोपत्रीचवन्यजीवांची शिकार होऊ नये, त्याचबरोबर जंगलतोड होऊ नये यासाठी प्रत्येक वन कर्मचाऱ्याला जंगलात गस्त घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र बहुतांश वन कर्मचारी गस्तीच्या नावावर घरी जाऊन झोपा काढत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे. प्रत्येक कर्मचारी जंगलात गस्त घालतो काय, याचा दरदिवशी आढावा घेणे आवश्यक आहे.