शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सापळ्यांमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: May 8, 2017 01:40 IST

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे पक्षी निसर्गातील सौंदर्य व अस्तित्व राखण्यात मोलाची भूमिका बजावितात.

शिकारी वाढल्या : नदी, नाले, पाणवठ्यांवर पसरवितात जाळे लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे पक्षी निसर्गातील सौंदर्य व अस्तित्व राखण्यात मोलाची भूमिका बजावितात. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांची सापळा रचून शिकार होत असल्याने पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र पक्ष्यांचा बचाव करण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. वनविभाग केवळ तेंदूपत्ता बोनस व गॅस वितरणातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. वनाचे व वन्यजीवांचे रक्षण करण्याचे अधिकार ज्यांना दिले आहे. ते जर उघड्या डोळ्यांनी वन व वन्यजीवांचा ऱ्हास पाहत असतील तर जीवांचे रक्षण करणार कोण, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. गावपातळीवर वन व वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांवर सोपविण्यात आली आहे. परंतु वनव्यवस्थापन समित्या अकार्यक्षम झाल्या आहेत. उन्हाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात वन्यप्राणी व पक्ष्यांचे निवारे नष्ट केल्या जात आहेत. उन्हाळ्याचा तडाखा अधिक असल्याने एप्रिल महिन्यातच जंगलातील पाणवठे नष्ट झाले आहेत. त्यामुळे जंगलातील प्राणी व पक्षीही गावाकडे धाव घेत आहेत. पाण्याच्या शोधार्थ प्राणी व पक्ष्यांचीही भटकंती होत आहे. गावाच्या आसपास असलेल्या तलाव, नदी, नाल्याच्या काठी सापळे रचून प्राणी व पक्ष्यांचीही शिकार होत आहे. अनेकदा वन्यप्राण्यांच्या शिकारी रात्रीच्या सुमारासही केल्या जातात. अनेक प्रकारची शक्कल लढवून प्राण्यांची शिकार केली जाते. परंतु शिकाऱ्यांकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने कोणतीच कारवाई केली जात नाही. गावातील वनसमित्या केवळ नावापुरत्याच असल्याने जंगलातील जीव तर नष्ट होतच आहे. शिवाय अवैध वृक्षतोड, बांबूकटाई होत आहे. त्यामुळे वन्यजीव धास्तावलेले आहेत. वन्यजीव गावांकडे येत असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक पक्ष्यांचे अस्तित्त्व सध्या धोक्यात असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात विविध पक्षी आहेत. परंतु विशेषत: ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात शिकारी वाढत असल्याने त्यांचे अस्तित्त्व धोक्यात आहे. पारवा व हारावतांचे प्रमाण घटत आहे पाणवठ्याजवळ असलेल्या झाडांवर मोहाच्या झाडापासून काढलेले चिक ओलसर काडीला चिकटवून मांडले जाते. पाणी पिण्यासाठी येणाऱ्या पारवा, हारावत यासह अन्य पक्ष्यांची शिकार केली जाते. त्यामुळे दिवसेंदिवस महाराष्ट्राचा राज्य पक्षी असलेला हारावत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डोंगरी भागात हारावत या पक्ष्याचे वास्तव्य असते. परंतु पाणी पिण्यासाठी हारावत शक्य असलेल्या पाणवठ्यावर जातात. परंतु शिकाऱ्यांकडून पसरविण्यात आलेले सापळे पक्ष्यांच्या जीवांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. जिल्ह्यातील डोंगरी भागात हारावत पक्ष्यांचे अस्तित्व आहे. यासह पारवा पक्ष्याच्या अनेक जाती पाहायला मिळतात. परंतु शिकारीचे वाढते प्रमाण बघता अनेक पक्ष्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.