शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

मजुरीसाठी अडविले तेंदूपत्त्याचे ट्रक

By admin | Updated: May 31, 2017 02:15 IST

तेंदूची मजुरी न देताच तेंदूपत्ता भरून देणारे ट्रक अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथील नागरिकांनी गावाच्या सीमेवर मंगळवारी अडविले आहेत.

बोटलाचेरूवासीय आक्रमक : रक्कम दिल्याशिवाय ट्रक न सोडण्याचा निर्धार लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : तेंदूची मजुरी न देताच तेंदूपत्ता भरून देणारे ट्रक अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथील नागरिकांनी गावाच्या सीमेवर मंगळवारी अडविले आहेत. त्यामुळे मजुरीचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अहेरी पोलिसांनी तुळशीराम तापला, रवी मलय्या, तनकम व नागराज समय्या पुट्टा या तिघांकडून आठ दिवसांपूर्वी सुमारे पावणेदोन कोटी रूपयांची रोकड जप्त केली होती. सदर कंत्राटदार ही रोकड नक्षल्यांना देण्यासाठी नेत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच कारणावरून तिघांनाही अटक करून रक्कम जप्त केली आहे. मात्र सदर रक्कम अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथील तेंदू मजुरांची मजुरी देण्यासाठी नेली जात होती, असा दावा गावकरी व कंत्राटदाराच्या मार्फतीने केला जात आहे. तक्रारदाराने तेंदू हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही मजुरीची रक्कम दिली नाही. कंत्राटदारांना पोलीस कोठडी मिळाली असल्याने त्यांची चौकशी सुरू आहे. मजुरांना मजुरी देण्यासाठी आणलेले पैसे पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे मजुरीची व रॉयल्टीची रक्कम कंत्राटदाराकडून उपलब्ध होण्यास साशंकता निर्माण झाली आहे. अशातच कंत्राटदाराने मजुरी न देता ट्रकच्या माध्यमातून तेंदूपत्ता उचलण्याची तयारी सुरू केली. तेंदूपत्ता भरलेले ट्रक गावाबाहेर जात असल्याची माहिती बोटलाचेरू येथील नागरिकांना माहित होताच त्यांनी गावाच्या वेशीवरच ट्रक अडविले. जोपर्यंत तेंदूपत्त्याची रक्कम उपलब्ध होत नाही. तोपर्यंत आपण तेंदूपत्ता नेऊ देणार नाही, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. बोधाने भरलेले ट्रक गावाच्या वेशीवरच थांबवून ठेवण्यात आले आहेत. तेंदूपत्ता व मजुरीची रक्कम न मिळाल्यास गरीब नागरिक अडचणीत येणार आहेत. तेंदूपत्त्याची रक्कम उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने मध्यस्थी करावी, अशी मागणी बोटलाचेरू येथील नागरिकांनी केली आहे.