शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

परिवहनला हव्यात पालिकेच्या कुबड्या

By admin | Updated: March 10, 2016 02:02 IST

ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या मूळ अंदाजपत्रकात ठाणे महापालिकेकडून महसुली आणि भांडवली खर्चापोटी सुमारे १४४.३४ कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवून परिवहनचा गाडा रुळावर आणण्याचा दावा केला

पत्रकार परिषद : आंबेडकर टिचर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मागणीगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांचे स्वीय सहायक देवेंद्र मनोहर मेश्राम यांना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य समीर केने यांनी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता विद्यापीठाच्या व्हिडिओ कॉन्फरिन्स रूममध्ये बोलावून दरवाजा बंद करून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कुलसचिव कार्यालयाच्या महिला शिपायामार्फत मेश्राम यांना मारहाण करायला लावली, असा आरोप करीत समीर केने यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर असोसिएशन चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.या पत्रकार परिषदेला गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. इसादास भडके, सचिव प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर, प्रा. डॉ. बी. एम. कऱ्हाडे, प्रा. डॉ. संजय उराडे, प्रा. रवी वाळके, प्रा. डॉ. प्रकाश तितरे व मुनिश्वर बोरकर उपस्थित होते. यावेळी प्रा. भडके म्हणाले, विद्यापीठात २२ फेब्रुवारी रोजी घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आहे. पदाधिकाऱ्यांनी असे कृत्य करणे योग्य नाही, या घटनेसंदर्भात स्वीय सहायक देवेंद्र मेश्राम याने गडचिरोलीच्या पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे. मात्र कारवाई झाली नाही. समीर केने यांच्यावर कारवाई करून त्यांना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (स्थानिक प्रतिनिधी)मारहाणीची घटना विद्यापीठात घडली नाही- केनेयासंदर्भात विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य समीर केने यांची बाजू जाणून घेतली असता, केने यांनी गोंडवाना विद्यापीठात मारहाण केल्याची कोणतीही घटना घडली नाही. मला नाहक या प्रकरणात का गोवण्यात येत आहे, असा प्रश्न करून टिचर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत, विद्यापीठात शिपाई पदावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वीय सहायक देवेंद्र मेश्राम यांच्या विरोधात कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. देवेंद्र मेश्राम याने आपल्याला अर्वाच्य शब्दात बोलून माझ्याशी गैरवर्तन केले, असे तक्रारीत नमूद केले आहे. सदर प्रकार मला माहित झाल्यावर आपण दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार का करावी, याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधित कर्मचारी महिलेला न्याय मिळावा, अशी मागणी समीर केने यांनी केली.