लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : देसाईगंज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथे हलविण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आदेश काढले आहेत. पुराडा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत पुराडा, मालेवाडा, गॅरापत्ती, कोटगूल, मसेली, बेडगाव, कोरची, कुरखेडा, देसाईगंज पोलीस ठाणे येतात. कुरखेडा व कोरची तालुक्यातील नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहेत. त्यामुळे एखादी नक्षल घटना घडल्यास वेळीच निर्णय घेऊन तत्काळ मदत पोहोचविता यावी, हा उद्देश समोर ठेवून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे स्थानांतरण करण्यात येणार आहे. सदर उपविभागीय कार्यालय यापूर्वीही कुरखेडाच्याच नावाने चालविले जात होते. मात्र कार्यालयासाठी कुरखेडा येथे जागा उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे हे कार्यालय देसाईगंज येथून चालविले जात होते. आता स्थानांतरण झाल्याने नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे.
एसडीपीओ कार्यालयाचे पुराडात स्थानांतरण
By admin | Updated: May 18, 2017 01:40 IST