शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लोहप्रकल्पाची जमीन लॉयड्सकडे हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 01:14 IST

चामोर्शी तालुक्यातील कोनसरीच्या प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी अखेर सर्व सरकारी सोपस्कार पार पाडत एमआयडीसीने ५०.२९ हेक्टर जागा लॉयड्स मेटल अ‍ॅन्ड एनर्जी लि. या कंपनीकडे शुक्रवारी हस्तांतरित केली.

ठळक मुद्देउभारणीचा मार्ग मोकळा : ५०.२९ हेक्टर जमिनीवर होणार प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरीच्या प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी अखेर सर्व सरकारी सोपस्कार पार पाडत एमआयडीसीने ५०.२९ हेक्टर जागा लॉयड्स मेटल अ‍ॅन्ड एनर्जी लि. या कंपनीकडे शुक्रवारी हस्तांतरित केली. त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबतच प्रकल्पाला होत असलेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना पूर्णविराम मिळाला आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने नागपूर येथील मुख्य सर्व्हेअर एस.बी.दशमुखे यांनी कंपनीकडे जमीन हस्तांतरित करीत असल्याचे पत्र दिले. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या शेतकºयांच्या जमिनींचा मोबदला एमआयडीसीकडे भरण्याची प्रक्रिया सदर कंपनीने फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच केली होती. शेतकऱ्यांकडून घेतल्या जात असलेल्या जमिनीची किंमत, ३ टक्के संयुक्त मोजणी खर्च, ६ टक्के महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) देखभाल खर्च आदी पकडून एमआयडीसीने ६ कोटी ८६ लाख ६९ हजार ८१८ रुपये लॉयड्स मेटलकडून घेतले. त्यानंतर पुन्हा देखभाल खर्च म्हणून एमआयडीसीने अतिरिक्त शुल्क भरण्याची नोटीस सदर कंपनीला दिली होती. आता ती सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन एकदाची जागा कंपनीकडे सुपूर्द करण्यात आल्यामुळे प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सव्वा वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची पायाभरणी करताना वर्षभरात प्रकल्प उभारणीचे काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते. मात्र सव्वा वर्ष लोटले तरी प्रकल्प उभारणीसाठी कोणत्याही हालचाली नसल्यामुळे शंका व्यक्त होत होती.एक सातबारा-एक नोकरीया प्रकल्पासाठी ३८ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे प्रकल्पग्रस्त म्हणून काही लाभही मिळणार आहे. त्यात प्रतिसातबारा एक नोकरी याप्रमाणे प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ दिला मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पात कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळण्याच्या शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश२३ आॅगस्टला झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये या प्रकल्पाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. गडचिरोलीच्या विकासासाठी हा लोहप्रकल्प महत्वाचा असल्यामुळे लवकरात लवकर प्रकल्प सुरू करण्यासाठी बाकी असलेल्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. वनविभागाच्या अडचणी दूर करण्यासाठीही त्यांनी निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे.