उमेदवारांचा सहभाग : तहसील कार्यालयाचा उपक्रम गडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्च कशा पद्धतीने सादर करावा, याबाबतचे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले. गडचिरोली तसेच धानोरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्च ठेवणे व निवडणूक शाखेला सादर करणे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा कोषागार अधिकारी उमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण देवरे, लेखाधिकारी मनोज कंगाली, उपकोषागार अधिकारी अश्लेष गायकवाड यांनी जि. प. व पं. स. उमेदवारांना प्रशिक्षण दिले. यावेळी लिड बँकेचे व्यवस्थापक खांडेकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
निवडणूक खर्च सादर करण्याचे प्रशिक्षण
By admin | Updated: February 11, 2017 01:56 IST