शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बसने वाहतुकीचा खोळंबा

By admin | Updated: July 27, 2016 01:52 IST

गडचिरोलीवरून गोंडपिपरीकडे जाणारी बस मंगळवारी सकाळी १० वाजता मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर

चालकाने एसटी लावली आडवी : आष्टीच्या आंबेडकर चौकातील प्रकार आष्टी : गडचिरोलीवरून गोंडपिपरीकडे जाणारी बस मंगळवारी सकाळी १० वाजता मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरच लावली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. सदर चालकाला ताकीद देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. आष्टी येथील मुख्य चौकातून अहेरी, सिरोंचा, चंद्रपूर, गोंडपिपरी व आष्टी परिसरातील ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या बसेस थांबतात. त्यामुळे या ठिकाणी खासगी वाहने व बसची नेहमीच वर्दळ राहते. गोंडपिपरीकडे जाणाऱ्या बसेस चंद्रपूर मार्गावर रस्त्याच्या बाजुला थांबविणे आवश्यक आहे. मात्र मंगळवारी आष्टी-गोंडपिपरी बसच्या चालकाने बस सरळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच उभी केली. या ठिकाणी येणाऱ्या बसेस जवळपास पाच ते दहा मिनीटे थांबतात. एवढ्या कालावधीत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. सदर बस रस्त्याच्या बाजुला लावणे आवश्यक असतानाही मधोमध लावले जाते. मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या मध्यंतरी बस लावण्याचे प्रकार वाढले आहेत. संबंधित चालकांवर पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने हळूहळू चालकांची हिंमत वाढत चालली आहे. ही गंभीर बाब असून याकडे एसटी प्रशासनाने सुद्धा जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे नागरिकांनी म्हटले आहे. डॉ. आंबेडकर चौकातील चारही मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून दुकाने थाटले आहेत. फेरीवालेही रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटतात. अशातच एसटीसह प्रवाशी वाहने अगदी रस्त्याच्या मधोमध उभी केली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा आणखी वाढला आहे. यामुळेच आष्टी येथे अपघातांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढले आहे. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करणाऱ्या चालकांवर तसेच वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आष्टी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)