शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बोचऱ्या थंडीतही गडचिरोलीतील मंडईला जोरदार प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 11:05 IST

गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा प्रकोप वाढला असला तरी दिवसा सायंकाळपर्यंत भरणाऱ्या मंडईला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्दे शेकडो वर्षांपासून सामाजिक व सांस्कृतिक परंपरा कायम

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : विदर्भातील झाडीपट्टी म्हणून गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. दीपावलीनंतर दरवर्षी झाडीपट्टी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंडई भरविली जाते. तसेच रात्रीच्या सुमारास मनोरंजन म्हणून झाडीपट्टीच्या नाट्यप्रयोगांचे आयोजन केले जाते. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा प्रकोप वाढला असला तरी दिवसा सायंकाळपर्यंत भरणाऱ्या मंडईला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवाय रात्री होणारे नाट्यप्रयोग बघण्यासाठी नाट्यरसिकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण लोकांनी मंडईच्या माध्यमातून गेल्या १०० वर्षांची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा कायम राखली आहे. दिवसा भरणाऱ्या मंडईमध्ये सभोवतालच्या आठ ते दहा गावातील महिला, पुरूष, युवक, युवती, शाळकरी मुले सहभागी होत आहेत. रात्रीच्या सुमारास झाडीपट्टी रंगभुमीचे नाट्यप्रयोग तसेच काही गावांमध्ये सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमही होत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, कोरची आदी तालुक्यांमध्ये मंडई व झाडीपट्टीच्या नाट्यप्रयोगांची रेलचेल प्रचंड वाढली आहे. अशा प्रकारची मंडई भरविणारे तसेच नाट्य प्रयोगांच आयोजन करणारे अनेक मंडळ गावागावात निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षापासून मंडई व नाट्य प्रयोग आयोजनाच्या कामात युवकांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे. मंडईतून नातेसंबंध दृढ होत आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिक