शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गोवारी बांधव जोपासत आहेत ढालपूजनाची परंपरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 17:18 IST

विष्णू दुनेदार/अतुल बुराडे्रगडचिरोलीग्रामीण जीवनाच्या पटलावर असंख्य जाती-जमाती, त्यांच्या उपजाती आजही आपल्या पारंपरिक धंदा आणि प्रथा, परंपरा जोपासत सुखनैव जीवन जगत आहेत. त्यातलीच एक जमात आहे गोवारी. वर्षांनुवर्षांपासून वंशपरंपरागत गुरेढोरे राखणारी जमात म्हणजे गोवारी. मात्र आज या जमातीतील तरु णतरूणी काही प्रमाणात सुशिक्षित झाले असले तरी गोवारी जमात बांधवांनी ढालपूजन ही ...

ठळक मुद्देदिवाळीला अनेक गावात ढालपूजनपूर्वजांची स्मृती राखण्याचा उद्देश

विष्णू दुनेदार/अतुल बुराडे्रगडचिरोलीग्रामीण जीवनाच्या पटलावर असंख्य जाती-जमाती, त्यांच्या उपजाती आजही आपल्या पारंपरिक धंदा आणि प्रथा, परंपरा जोपासत सुखनैव जीवन जगत आहेत. त्यातलीच एक जमात आहे गोवारी. वर्षांनुवर्षांपासून वंशपरंपरागत गुरेढोरे राखणारी जमात म्हणजे गोवारी. मात्र आज या जमातीतील तरु णतरूणी काही प्रमाणात सुशिक्षित झाले असले तरी गोवारी जमात बांधवांनी ढालपूजन ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा वर्तमानात सुरू ठेवली आहे, हे विशेष !महाराष्ट्र राज्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या विदर्भ प्रदेशातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये गोवारी, गोंडगोवारी हा समाज वसलेला आहे. परंतु ग्रामीण भागातील गोवारी जमात ओळखली जाते दिवाळी सणाच्या पर्वावर केल्या जाणाºया ढालपूजन या आगळ््यावेगळ््या प्रथेसाठी.गोवारी जमातीतील बांधव आपल्या पूर्वजांची स्मृती जपून त्यांचे पूजन करण्यासाठी आजही ढाल तयार करु न दिवाळीच्या दिवशी पूजन करतात. एका उंच बासावर लाकडी चौकट बसवून सजवतात तिला गोवारी ढाल म्हणतात. दिवाळीच्या दिवशी ती ढाल घरी उभी करतात व गायी गोदनाच्या वेळी वाजत गाजत आखरावर आणली जाते व या निमित्ताने गोवारी बांधव एकत्र येतात.गायी गोदनला गोवारी बांधव खूप महत्त्व देतात. दिवाळीच्या दिवशी गोदन तयार करण्यासाठी घोणस गवत व गाईचा शेण याचा वापर करतात. गोदन तयार झाल्यानंतर गावातील बांधव आपआपल्या गार्इंना गोदनावरु न नेतात. त्या नंतर गोवारी बांधव ढालींची मिरवणूक काढतात.ढालीचे दोन प्रकार असतात. एक नर ढाल म्हणजे पुरु षाच्या स्मृती जोपासणारी तिला गोहळा म्हणतात तर दुसरी मादी ढाल म्हणजे स्त्रीच्या स्मृती जोपासणारी तिला गोहळी म्हणतात. गोवारी बांधव गोहळा-गोहळी ढालीला पुरु ष व स्त्रीवाचक नाव सुध्दा देतात. गोवारी बांधव ढालीचे पूजन वर्षातून तीनदा, आखाडी, मातापूजन व दिवाळीला करीत असले तरी दिवाळीच्या ढाल पूजनाला विशेष महत्त्व देतात व मिरवणूक काढतात.ढालीची सजावट आकर्षक असते. मोरिपसे, शेल्ली, फुल्ली, दुप्पटा व खण अशी साधने वापरु न सजवलेली ढाल वाजतगाजत गाय गोदनापर्यंत आणली जाते. गोवारी बांधव ढाल धरणाºया समोर जोशात नाचतात. नंतर गोदनाजवळ पारंपारिक लाठी फेरण्याचा कार्यक्र म होतो. यामध्ये कुडा या वनस्पतीच्या लाठीला गेरु लावून वापर करतात. हा कार्यक्र म उपस्थित लोकांचे लक्ष वेधून घेते. अशाप्रकाच्या ढाल पूजनाचा कार्यक्र म देसाईगंज तालुक्यातील तुळशी, कोकडी, विसोरा, शंकरपूर, चोप, कोरेगाव, बोळधा या ठिकाणचे गोवारी बांधव आजही मोठ्या उत्साहानं साजरा करतात. 

टॅग्स :diwaliदिवाळी