शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी नेणारी तब्बल ४१ जनावरे पकडली

By admin | Updated: July 2, 2016 01:29 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी गुरूवारी आपल्या कर्मचाऱ्यांसह लाखांदूर मार्गावरील गांधी नगर येथे ....

पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त : देसाईगंज पोलिसांची गांधी नगरात कारवाईदेसाईगंज : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी गुरूवारी आपल्या कर्मचाऱ्यांसह लाखांदूर मार्गावरील गांधी नगर येथे धाड टाकून कत्तलीसाठी नेण्यात येणारी एकूण ४१ जनावरे पकडून त्यांची कसायापासून सुटका केली. देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा लाखांदूर मार्गावरील गांधीनगर येथे जनावरांची अवैधरित्या विक्री करून त्या जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती देसाईगंजचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना मिळाली. लागलीच पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह गांधीनगर येथे पोहोचून चौकशी केली असता, एमएच-२७-एम-५९७० या क्रमांकाचे मिनी मेटाडोअर वाहन दिसले. या वाहनांची झडती घेतली असता, गाडीत कोंबून भरलेले लहान, मोठे नऊ बैल आढळून आले. याची किंमत २७ हजार रूपये आहे. तसेच त्याच परिसरात ३२ मोठे गाय, बैल दावणीला बांधल्याचे दिसून आले. या जनावरांची किंमत ९६ हजार रूपये आहे. देसाईगंज पोलिसांनी गांधी नगर येथून वाहनासह एकूण २ लाख ७३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी नरेश नामदेव पारधी (२८), देवचंद वासुदेव नखाते (३२) रा. गांधीनगर यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५, ५ (अ), (१), ५ (अ), (२), ५ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात देसाईगंजचे पोलीस हवालदार प्रकाश डोर्लीकर करीत आहे. पोलिसांनी पकडलेली संपूर्ण ४१ जनावरे गोरक्षा समिती ब्रह्मपुरी यांच्या सुपूर्द करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)