शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

आजपासून कृषी व पशू संवर्धन महिना पाळणार

By admin | Updated: June 9, 2014 23:38 IST

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना व पशु पालकांना कृषी व पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १0 जून ते १0 जुलै या कालावधीत २५0 मेळावे

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकर्‍यांना व पशु पालकांना कृषी व पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १0 जून ते १0 जुलै या कालावधीत २५0 मेळावे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशु संवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील पशुधनाच्या संख्येत वाढ करणे, उपलब्ध पशु धनाच्या आरोग्याची काळजी घेणे, जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वाढ करणे, पशु संवर्धन विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांकडे पोहोचविण्यासोबतच बेरोजगारांना शेळीपालन, वराह पालन, कुकुट पालन, गोपालन या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परिपूर्ण माहिती देऊन स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागामार्फत १५0 मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यात जनावरांचे आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार असून जनावरांची तपासणी करण्यासोबतच विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनांची माहितीही दिली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद कृषी विभाग,  राज्य शासनाचा कृषी विभाग व आत्मा प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती देणे, बांधावर खत योजना, o्रीपध्दतीची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकर्‍यांना फायदा करण्यासाठी माहिती देणे, या कामांसोबत बियाणांवर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणे, विविध खतांचा शास्त्रोक्त पध्दतीने वापर करणे, खरीप हंगामाचे नियोजन, जिल्ह्यातील वितरित केलेल्या आधुनिक यंत्राचे प्रात्याक्षिक करून शेतकर्‍यांना प्रशिक्षीत करणे, मॅट नर्सरी, o्री पध्दतीची भाताची लागवड, सोयाबीन लागवड, कापूस लागवड तसेच मशीनद्वारे सोयाबीन, कापूस लागवड करून २0 ते ३0 टक्के उत्पादनात वाढ करणे, हळदीची लागवड, पावसाळी मका, भाजीपाल्यासोबत इतर पिकाची माहिती देणे, औषधी फवारणी या विषयी शेतकर्‍यांमध्ये माहिती दिली जाणार आहे. कृषी मेळाव्याच्या माध्यमातून पशुधनाची काळजी घेण्यासाठीसुध्दा प्रयत्न केले जाणार आहेत. औषधोपचार, दुग्धपालन, बकरी, शेळी, मेंढी, कुक्कुट पालन याविषयीही जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाचे दीडशे व पशु संवर्धन विभागाकडून दीडशे मेळावे १0 जून ते १0 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांनी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती गण्यारपवार यांनी केले आहे. जि.प.मार्फत राबविण्यात येणार्‍या या उपक्रमासाठी कृषी व पशु संवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. शिरीष रामटेके, कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरातील कृषी व पशु संवर्धन विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. १0 जून ला गडचिरोली तालुक्यातील पारडी येथे या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)