शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांचे मानधन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:06 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून आंदोलन करण्याचा इशारा धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देरोहयो कर्मचारी संकटात : २ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून आंदोलन करण्याचा इशारा धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात कोट्यवधी रूपयांची कामे केली जात आहेत. या कामांचा हिशेब व इतर कार्यालयीन कामे करण्यासाठी एकूण ११ कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना तांत्रिक पॅनल अधिकारी असे संबोधल्या जाते. या कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर २०१७ पासून आजपर्यंत मानधनच झाले नाही. तर एपीओ व सीडीपीओ कर्मचाºयांना फेब्रुवारी २०१८ ते आतापर्यंत चार महिन्यांचे मानधन मिळाले नाही.कंत्राटी कर्मचाऱ्यांना अगोदरच कमी मानधन दिले जाते. त्यातही ते वेळेवर दिले जात नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची पाळी आली आहे. मानधन देण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. वारंवार चर्चा सुद्धा केली. मात्र मानधन मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. दोन दिवसात मानधन न दिल्यास २ जूनपासून कार्यालयात बेमुदत लेखनीबंद आंदोलन करू व या कालावधीत होणाऱ्या कार्यालयीन कामाच्या विलंबास प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर बी.के. राऊत, व्ही.सी. भेडके, आर.व्ही. निकोडे, ए.एम. खेवले, व्ही.ए. मारगे, एस.एन. मडावी, एन.जे. राजगडे, व्ही.सी. सिडाम, व्ही.आर. सहारे, एस.एस. नंदागौरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो यांना पाठविले आहेत.तुटपुंजे मानधनरोहयो कर्मचाºयांना नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिशय तुटपुंजे मानधन दिले जाते. या मानधनातच संपूर्ण खर्च भागवावा लागतो. त्यामुळे रोहयो कर्मचारी आर्थिकदृष्ट्या खंगले आहेत. अनेकांनी तर मानधन परवडत नसल्याच्या कारणावरून नोकरीला राजीनामा दिला आहे. मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.