शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपासून मानधन थकीत

By admin | Updated: November 1, 2014 22:52 IST

मागील चार महिन्यांपासून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्याबरोबरच अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढही झाली नाही. त्यामुळे २१ नोव्हेंबरला अंगणवाडी

अंगणवाडी महिला आक्रमक : २१ नोव्हेंबरला दिल्लीवर देणार धडकगडचिरोली : मागील चार महिन्यांपासून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्याबरोबरच अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढही झाली नाही. त्यामुळे २१ नोव्हेंबरला अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्यावतीने दिल्ली येथे आंदोलन करण्यात येणार आहे. अंगणवाडी महिला केंद्र व राज्य सरकारच्यावतीने मानधन दिल्या जाते. अंगणवाडी सेविकेला ५ हजार तर मदतनीसला २ हजार ५०० रूपये दिले जात असले तरी गडचिरोली ज्ल्ह्यिातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. मागील चार महिन्यांपासून राज्य शासनाचे तर दोन महिन्यांपासून केंद्र शासनातर्फे दिले जाणारे वेतन थकीत आहे. दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर २१ आॅक्टोबरला गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनही करण्यात आले व आपल्या विविध मागण्यांची निवेदन महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल भडांगे यांना देण्यात आले. परंतु अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एकात्मिक बालविकास योजनेचा प्रारंभ होऊन ४० वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अंगणवाडी सेविका तसेच मदतनिस सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ देण्यात आला नाही. महाराष्ट्रातील २ लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एक महिन्याचा दीर्घकालीन संप केला होता. अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय ३० एप्रिल रोजी घेण्यात आला असला तरी सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे २१ नोव्हेंबरला दिल्ली येथे रामलिला मैदानावर आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी दिली. वेतनाच्या मुद्यावर अंगणवाडी कर्मचारी आक्रमक आहेत. (शहर प्रतिनिधी)