शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टिपुराने उजाळले मार्कंडेश्वर मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:14 IST

मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरावर तेल व तुपाचा टिपूर (दिवा) गुरूवारी सायंकाळी लावण्यात आला. टिपूर लावताना बघण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

ठळक मुद्देअमावस्येच्या मुहूर्तावर लावला दिवा : बघण्यासाठी भाविकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कमार्कंडादेव : मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरावर तेल व तुपाचा टिपूर (दिवा) गुरूवारी सायंकाळी लावण्यात आला. टिपूर लावताना बघण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती.महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे मंदिराच्या गाभाऱ्यात महापूजा केली जाते व जत्रेला सुरूवात होते. अमावस्येच्या रात्री मार्कंडेश्वराच्या मंदिरावर टिपूर लावण्याची परंपरा आहे. टिपूर लावण्याच्या दिवशी सुध्दा जत्रेमध्ये मोठी गर्दी उसळते. परंपरेनुसार सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील राजू म्हशाखेत्री व प्रशांत म्हशाखेत्री यांनी सव्वा किलो तुपाचा टिपूर तर व्याहाड खुर्द येथीलच सुखदेव गुरनुले यांनी तेलाचा दिवा लावला. यावेळी तहसीलदार अरूण येरचे, पीआय प्रदीप लांडे, पुरातत्व विभागाचे सहायक सवरक्षक पचिने, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, रामू तिवाडे, मनोज रणदिवे, पंकज पांडे, अरूण गायकवाड, उज्वल गायकवाड, नेहरू राणे, रामू गायकवाड, पुरातत्व विभागाचे छबीलदास सुरपाम आदी उपस्थित होते.मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरू असल्याने यावर्षी मुख्य मंदिराच्या उजव्या बाजुकडील कळसावर टिपूर लावण्यात आला. मार्कंडेश्वर मंदिरावरील टिपूर हा रामटेक येथे दिसत होता. अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामीण भागातील बहुतांश भाविक टिपूराला महत्त्व देत असल्याने टिपूर लावण्याच्या दिवशी मार्कंडेश्वराचे दर्शन घेतात.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली