शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

टिल्लूपंप जप्ती मोहीम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:26 IST

गडचिरोली शहरानजीकच्या वैनगंगा नदीची पाणीपातळी दरवर्षीच्या उन्हाळ्यात खालावत असल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. दरम्यान उन्हाळ्यात पालिकेच्या वतीने टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्यात येते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात सदर टिल्लू पंप जप्ती मोहीम एजंसीमार्फत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईवर उपाययोजना : निविदा काढून एजंसीला काम देणार; पालिकेच्या हालचाली वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरानजीकच्या वैनगंगा नदीची पाणीपातळी दरवर्षीच्या उन्हाळ्यात खालावत असल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. दरम्यान उन्हाळ्यात पालिकेच्या वतीने टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्यात येते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात सदर टिल्लू पंप जप्ती मोहीम एजंसीमार्फत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.पालिकेच्या वतीने टिल्लू पंप जप्ती मोहिम शहरात राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया बोलावून एजंसीची निवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने गतीने कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदर काम एजंसीला देण्यात यावे, असा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत यापूर्वीच घेण्यात आला आहे.गडचिरोली शहरात एकूण १२ प्रभाग असून २५ वॉर्ड आहेत. पालिकेची नळ पाणीपुरवठ योजना वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर कार्यान्वित करण्यात आली आहे. शहरात जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले असून नदीपात्रात इनटेक वेल व नदीच्या वर मोठी टाकी बसविण्यात आले आहेत. याशिवाय बोरमाळा मार्गावर पालिकेने जलशुद्धीकरण केंद्र बसविले आहे.शहरातील रामनगर, गणेशनगर तसेच विसापूर, विसापूर टोलीसह काही भाग चढ आहे. दरवर्षीच्या उन्हाळ्यात वैनगंगा नदीची पाणीपातळी खालावत असल्याने नळ योजनेच्या इनटेक वेलमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात येत नाही. शिवाय पाणी टाकीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी येत नाही. त्यामुळे शहराच्या बऱ्याच भागात नळाद्वारे पाणी पोहोचत नाही. अशा स्थितीतही शहराच्या बºयाच भागात वरच्या मजल्यावर अनेक नागरिक टिल्लू पंप लावून पाणी खेचतात. परिणामी अनेक नळधारकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही.सध्यास्थितीत शहरातील गणेशनगर, रामनगर, विसापूर, विसापूर टोली, स्नेहनगर व इतर काही वॉर्डात पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. नदीची पाणीपातळी खालावल्यामुळे गेल्या महिनाभरापासून केवळ सकाळच्या सुमारास एकदाच नळाला पाणी सोडले जात आहे. गडचिरोली शहरात पालिकेने बसविलेली नळ पाईपलाईन ही खुप जुनी असून सदोष आहे. त्यामुळे नळाद्वारे पाण्याचे असमान वितरण होत आहे. या समस्येला मार्गी लावण्यासाठी आता पालिकेच्या वतीने एजंसीमार्फत टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ज्या नळधारकाच्या घरी नळाला टिल्लू पंप लावून पाणी खेचत असल्याचे दिसून आल्यास संबंधित नळधारकाकडून प्रत्येकी दोन हजार रूपयांचे दंड आकारण्यात येणार आहे. यातील जवळपास निम्मी रक्कम संबंधित एजंसीला मिळणार आहे.गतवर्षी ७० टिल्लू पंप जप्तगतवर्षीच्या उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच नगर पालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांमार्फत टिल्लू पंप जप्ती मोहिम राबविण्यात आली. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत पालिकेच्या वतीने गतवर्षी जवळपास ७० टिल्लू पंप जप्त करून संंबंधित टिल्लू पंपधारकावर दोन हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. यापैकी अनेकांनी दंडाची रक्कम भरून आपले टिल्लू पंप सोडविले नाही. यावर्षीही अनेक वॉर्डात आत्तापासूनच नळाला पाणी येत नसल्याच्या अनेक तक्रारी पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन मुख्याधिकाºयांनी एजंसीमार्फत टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहिम एप्रिल अखेर सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.