शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत विद्युत प्रवाहित तारांमध्ये अडकून पट्टेदार वाघीण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 11:25 IST

रानडुकरांना पकडण्यासाठी लावलेल्या अवैध विद्युत प्रवाहित तारांमध्ये अडकून एक वाघीण ठार झाल्याचे शुक्रवारी सकाळी चपराळा अभयारण्याजवळच्या शेतात निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देरानडुकरांच्या अवैध शिकारीने घेतला वाघिणीचा बळीवनविभागाचे विद्युत तारांच्या अवैध सापळ््यांकडे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतगडचिरोली - रानडुकरांना पकडण्यासाठी लावलेल्या अवैध विद्युत प्रवाहित तारांमध्ये अडकून एक वाघीण ठार झाल्याचे शुक्रवारी सकाळी चपराळा अभयारण्याजवळच्या शेतात निदर्शनास आले आहे.चामोर्शी तालुक्यातील मारोडा जामगिरी जंगलातील शेताजवळ शुक्रवारी पहाटे पट्टेदार वाघीण व रानडुक्कर मृतावस्थेत आढळून आले. त्यांची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे निदर्शनास आले.गडचिरोलीच्या जंगलात असलेल्या रानडुकरांच्या शिकारीसाठी शिकार करणारे जंगलाजवळ किंवा शेताजवळ विद्युत तारा लावून ठेवतात. या तारांमध्ये अडकून विजेचा धक्का लागून संबंधित जनावर जागीच ठार होत असते. याच तारांनी गुरुवारी रात्री एका वाघिणीचा बळी घेतला.ही वाघीण आरमोरी देसाईगंज भागात फिरत असल्याचे गावकऱ्यांचे सांगणे आहे. तिने या भागात दोघांवर हल्लाही चढविला होता. त्यामुळे तिला चपराळा संरक्षित क्षेत्रात आणून सोडण्यात आले होते. मात्र रात्री रानडुकराच्या मागे धावताना वाघीण व रानडुक्कर असे दोघेही या तारांमध्ये अडकले असावेत आणि मृत्युमुखी पडले असावेत असा कयास व्यक्त केला जातो आहे.शेताचे रक्षण असो वा अवैध शिकार, त्याकरिता लावण्यात येत असलेल्या विद्युत तारांमध्ये वाघ किंवा वन्यजीव सापडून प्राणास मुकण्याच्या घटना एवढ्यात अधिक घडल्या आहेत. वनविभागाला या अवैधरित्या लावण्यात येत असलेल्या तारा माहित असूनही त्याकडे त्याचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या वाघिणीचा मृत्यू विद्युत प्रवाहाने झाला नसल्याचे वनविभागाचे म्हणणो असले तरी, त्यातील सत्यता अंतिम तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.