शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाघांचा धुमाकूळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST

जीवन जुवारे(५५) रा. राजगाटा चेक असे जखमीचे नाव आहे. जुवारे हे इतर सहा शेतकऱ्यांसाेबत शेतशिवारात बैल चारत हाेते. रस्त्याच्या ...

जीवन जुवारे(५५) रा. राजगाटा चेक असे जखमीचे नाव आहे. जुवारे हे इतर सहा शेतकऱ्यांसाेबत शेतशिवारात बैल चारत हाेते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडूपांमध्ये वाघ लपून बसला हाेता. जुवारे हे झुडुपांजवळ गेले असता वाघाने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात जुवारे हे जमिनीवर काेसळले. त्यानंतर पुन्हा वाघाने त्यांच्या छातीवर पंजा मारला. त्यामुळे जुवारे यांना पाठीवर व छातीवरही जखम झाली. वाघाने हल्ला करताच साेबत असलेल्या शेेतकऱ्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे वाघ पळून गेला व जुवारे यांचा जीव वाचला.

विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी राजगाटा चेक येथीलच शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र ताे व्यक्ती झाडावर चढल्याने त्याचे प्राण वाचले.

बाॅक्स

गायींनी वाघाला लावले पळवून

रांगी: आरमोरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नरचुली येथील पशुपालकांच्या गायी गुरुवारी दुपारी जंगल परिसरात चरत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने गायींच्या कळपावर हल्ला करून एका गायीला पकडले. यावेळी इतर गायींनी वाघावर जाेरदार हल्ला चढविला. यामुळे भयभीत झालेल्या वाघाने पळ काढला. ज्या गायीला वाघाने पकडले हाेते ती गाय गंभीर जखमी झाली. काही वेळाने ती मरण पावली.

याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली. ज्या ठिकाणी गाय ठार झाली, त्या परिसरात कॅमेरा लावून ठेवण्यात आला आहे. वाघाची शिकार ठरलेली गाय नरचुली येथील जितेंद्र गेडाम यांच्या मालकीची आहे. वाघाचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.