शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

थिमेटच्या पाण्याने विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:22 IST

तालुक्यातील धमदीटोला येथील सार्वजनिक विहिरीत थिमेटयुक्त पाणी आढळल्याने गुरुवारी सकाळी गावात खळबळ उडाली आहे. हे थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना विषबाधा झाली.

ठळक मुद्देसतर्कतेने टळला अनर्थ : धमदीटोलाच्या सार्वजनिक विहिरीतील प्रकार

ऑनलाईन लोकमतकुरखेडा : तालुक्यातील धमदीटोला येथील सार्वजनिक विहिरीत थिमेटयुक्त पाणी आढळल्याने गुरुवारी सकाळी गावात खळबळ उडाली आहे. हे थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना विषबाधा झाली. वैद्यकीय अधिकारी व पोलीस गावात पोहचल्यानंतर योग्य उपचार करीत त्यांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.गावातील काही महिला गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या. या पाण्याने बनवलेला चहा घेताच दोन-तीन जणांना उलट्या होऊ लागल्या. काही महिलांनी स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. परंतु स्वयंपाकातील पदार्थांना दुर्गंधी येऊ लागली. काही क्षणातच ही वार्ता गावभर पसरली. घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य नाजुक पुराम घटनास्थळी गेले. वैद्यकीय अधिकारी डॉ.दामले व सहायक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर हेही आपल्या सहकाऱ्यांसह धमदीटोला येथे पोहचले. त्यांनी चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी सार्वजनिक विहिरीची पाहणी केली असता त्यात थिमेट हा रासायनिक पदार्थ टाकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.यावेळी सर्वांनी विहिरीतील पाणी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले. डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या नागरिकांची तपासणी करुन औषधोपचार केला. याप्रसंगी पं.स.चे सभापती गिरीधर तितरराम, उपसभापती मनोज दुनेदार, जि.प. सदस्य नाजूक पुराम, सहायक बीडीओ मेश्राम, ग्रामसेवक कोहरे, सरपंच वर्षा धुर्वे, उपसरपंच सुखदेव कोरेटी हेही उपस्थित होते. नागरिकांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने व वैद्यकीय अधिकारी वेळेवर पोहचल्याने विषबाधेचा गंभीर परिणाम झाला नाही. संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडण्यात आले.श्वापदांना पळविण्यासाठी थिमेटचा वापरथिमेट ही एक स्फोटक रासायनिक पावडर असून तिचा उपयोग शेतातील किंवा घरातील वाळवी नष्ट करण्यासाठी तसेच वन्यपशूंना पळवून लावण्यासाठी केला जातो. या पावडरला कणकीत मिसळून त्याचे गोळे शेतात टाकले जातात. एखाद्या जनावराने ते तोंडात घेऊन चावले असता त्याचा स्फोट होतो व तो वन्यपशू जखमी होतो. गावकरी याचा वापर नेहमी करीत असतात.