शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेले अस्वल शंकरपुरात दाखल

By admin | Updated: May 26, 2016 02:27 IST

२५ मे च्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास शंकरपूर येथे पाण्याच्या शोधात भटकलेली हिंस्त्र अस्वल चक्क दारात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली.

गावकरी झाले भयभीत : नागरिकांच्या दारांवर पाण्यासाठी फिरलीविसोरा : २५ मे च्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास शंकरपूर येथे पाण्याच्या शोधात भटकलेली हिंस्त्र अस्वल चक्क दारात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली. उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. जंगलातील तसेच गावानजीकचे जलसाठे कोरडे झाल्याने वन्यजीवांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. वडसा-कुरखेडा मार्गावर स्थित शंकरपूर येथील चंद्रमणी लाडे यांच्या घरी बुधवारी पहाटे ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान अस्वलीचे आगमन झाले. हे कळताच ते घाबरून गेले परंतु हिमतीने त्यांनी तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न करताच ती शेजारील घरच्या बाथरुममध्ये घुसली तेव्हापर्यंत आजूबाजूचे नागरिक गोळा होऊन आरडाओरड करताच अस्वलीने नामदेव मेश्राम यांच्या घरी प्रवेश केला. अखेर पाण्याने व्याकूळ अस्वल मेश्रामच्या घरी पाणी पिऊन घराजवळील रस्ता ओलांडताच शेतातून जंगलाच्या दिशेने पळाली. जंगलात पाण्याचा अंशच उरला नसल्याने तहानलेली अस्वल मानवी वस्तीत आल्याचे दिसून येत आहे. घरातील अस्वल आगमनाने कसलीही जीवित वा वित्त हानी झाली नसली, तरी भविष्यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारीच्या वनांतील पाणीसाठे आटल्याने या परीसरात प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. वन विभागाने जंगलातील जलसाठे भरण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे हा प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे वन विभागावर रोष आहे. (वार्ताहर)