शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! वाघाने झडप घालून पकडला शेतकऱ्याचा पाय; सोबतच्यांनी केला प्रतिहल्ला आणि वाचवले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 21:03 IST

Gadchiroli News आपली गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर एका पट्टेदार वाघाने झडप घातली; पण सोबत असणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी वाघाच्या तावडीतून त्या शेतकऱ्याला सोडवत जीवनदान मिळवून दिले.

गडचिरोली : आपली गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर एका पट्टेदार वाघाने झडप घातली; पण सोबत असणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी वाघाच्या तावडीतून त्या शेतकऱ्याला सोडवत जीवनदान मिळवून दिले. हा थरार मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून १२ किलोमीटरवर असलेल्या मारकबोडीजवळच्या जंगलात घडला.बाबूराव तोदूरवार (६०) रा.मारकबोडी असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, बाबूराव यांच्यासह गावातील इतर पाच शेतकरी गावाजवळ असलेल्या वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) जंगलात बैलांना चारण्यासाठी नेले होते. बैलांना चरण्यासाठी सोडून सहाही जण एका झुडुपाजवळ सावलीत बसले होते. काही वेळानंतर बाबूराव हे उठून जाऊ लागले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने बाबूराव यांच्यावर झडप घातली. बाबूराव उभे झाले असल्याने त्यांची डाव्या पायाची मांडी वाघाच्या जबड्यात सापडली. वाघाने हल्ला केल्याचे पाहताच जवळच असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड करत वाघावर काठ्या उगारल्या. त्यामुळे घाबरून वाघाने बाबूराव त्यांना सोडून जंगलाकडे पळ काढला.

या हल्ल्यात बाबूराव यांच्या मांडीला वाघाच्या दातांचे व्रण पडून जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गडचिरोलीपासून अवघ्या १२ किलोमीटरवर ही घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे.

टॅग्स :Tigerवाघ