शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

माेहफुलाची दारू विकणाऱ्याला तीन वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2023 19:17 IST

Gadchiroli News राहत्या घरी माेहफुलाची दारू बाळगून तिची विक्री करणाऱ्या आराेपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने चामाेर्शी न्यायालयाने १५ मे राेजी त्याला तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली.

गाेपाल लाजूरकरगडचिराेली : राहत्या घरी माेहफुलाची दारू बाळगून तिची विक्री करणाऱ्या आराेपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने चामाेर्शी न्यायालयाने १५ मे राेजी त्याला तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली.

नारायण मुकुंदो मंडल, (४८) रा. विष्णुपूर असे शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. चामाेर्शी तालुक्याच्या विष्णुपूर येथील नारायण मुकुंदो मंडल हा राहत्या घरातून अवैधरित्या माेहफूल दारूविक्रीचा व्यवसाय करीत हाेता. त्याच्या अवैध व्यवसायाबाबत एक दिवस चामाेर्शी पाेलिस स्टेशनला माहिती मिळाली की, त्याने आपल्या घरी अवैधरित्या दारू बाळगली आहे. त्यानुसार चामोर्शी येथील पाेलिस हवालदार राजू उराडे यांनी विष्णुपूर गाठून पंचांसह आरोपीच्या घरी जाऊन त्याच्या घराची झडती घेतली. तेव्हा आरोपीच्या राहते घरी एकूण १०० लिटर मोहफुलाची दारू आढळली. पोलिसांनी पंचनामा कार्यवाही करून आरोपीविरुध्द चामोर्शी पाेलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून तपास केला व प्रकरण चामोर्शी येथील न्यायालयात वर्ग केला. सरकारी पक्षाच्या साक्षपुराव्यावरून आरोपीने अवैधरित्या १०० लिटर दारू बाळगल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी आरोपीस तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. डी. व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले.अवैध विक्रेत्यांना बसेल जरबदारू विक्रेत्यांवर थातूरमातूर कारवाई करून त्यांना साेडून देण्याचे प्रकार पाेलिस ठाण्यांमधून काही अधिकारी आर्थिक देवाणघेवाणीपाेटी करतात. असे अनेक प्रकार जिल्हाभर सुरू आहेत; परंतु अलिकडे न्यायालयांकडून दारूविक्रेत्यांना शिक्षा ठाेठावून अद्दल घडविली जात असल्याने अवैध विक्रेत्यांना जरब बसेल. परंतु यासाठी दारूविक्रेत्यांविराेधातील प्रकरण न्यायालयात पाेहाेचणे आवश्यक आहे. दारूविक्रेत्यांनाही कारावास हाेताे, ही बाब तेव्हाच जनमानसात पसरेल.

टॅग्स :Courtन्यायालय