लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी तालुक्यातील एकमेव कोत्तूर चिंचगुडी लघू सिंचन प्रकल्प मोटार व डीपी जळाल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद होता.या संदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर बिघाड दुरूस्त करून हा सिंचन प्रकल्प तब्बल तीन वर्षांनंतर सुरू करण्यात आला.गेल्या तीन दिवसांपूर्वी शेतकºयांनी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेऊन हा प्रकल्प पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली व सात दिवसांत हा प्रकल्प सुरू होईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर ना. आत्राम यांनी लगेच लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंत्यांना फोन करून चांगलेच खडसावले व तातडीने सर्व तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश दिले. नवीन मोटार व डीपी लावून लघुसिंचन प्रकल्प तीन दिवसांतच सुरू करण्यात आले. त्यामुळे कोत्तूर चिंचगुंडी परिसरातील जवळपास २०० एकर शेतजमिनीला सिंचनाची सुविधा झाली. शुक्रवारपासून शेतकºयांना पाणी देण्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता बोरकर, घुगे, भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, अहेरी शहराध्यक्ष मुकेश नामेवार, चिंचगुंडीच्या उपसरपंच स्वाती येनगंटीवार, पोलीस पाटील रामन्ना कोल्हावार, गुड्डू ठाकरे, दिनेश येनगंटीवार, रामू कस्तुरवार, पृथ्वीराज कोल्हावार, देवाजी कोल्हावार, सतीश भिनकर, लचना धंदेर, शंकर बुरी, सीताराम कुमराम, सुरेश रामगीरवार यांच्यासह कोतूर-चिंचगुंडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तीन वर्षांनंतर कोत्तूर-चिंचगुंडी लघु सिंचन प्रकल्प सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:11 IST
अहेरी तालुक्यातील एकमेव कोत्तूर चिंचगुडी लघू सिंचन प्रकल्प मोटार व डीपी जळाल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद होता.या संदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
तीन वर्षांनंतर कोत्तूर-चिंचगुंडी लघु सिंचन प्रकल्प सुरू
ठळक मुद्दे पालकमंत्र्यांचा पुढाकार : २०० एकर शेतीला सिंचन सुविधा