शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वर्षात वर्ग १ चे तीन अधिकारी अडकले

By admin | Updated: October 30, 2015 01:45 IST

२०१५ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात वर्ग १ दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा कोसळला आहे.

एक लाचखोर : दोघांना शिष्यवृत्ती घोटाळा भोवला गडचिरोली : २०१५ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात वर्ग १ दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा कोसळला आहे. दोन अधिकारी राज्यभर गाजलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात कारागृहाची हवा खावून आता जामिनावर सुटले आहे. तर आॅक्टोबर महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चा कार्यकारी अभियंता आनंद बाळकृष्ण डेकाटे याला ४८ हजार रूपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ग १ च्या अधिकाऱ्यांवर विविध घोटाळे व लाचेच्या प्रकरणात कारवाई एवढ्या मोठ्या स्वरूपात झालेली आहे. यापूर्वी आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वन विभागात भरती प्रक्रियेदरम्यान उपवनसंरक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती व त्यांची कारागृहात रवानगी झाली होती. त्यापूर्वी सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनाही लाचखोरीच्या प्रकरणात बऱ्याच वर्षाआधी पकडण्यात आले होते. वर्ग १ च्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता केल्या जाते याबाबत अनेकदा तक्रारीही होतात. परंतु कारवाई होत नाही, असे दिसून येत असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र शिष्यवृत्ती घोटाळ्यात सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त तुकाराम बरगे व आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता लाचखोरीच्या प्रकरणात कार्यकारी अभियंत्याला अटक झाल्याने पुन्हा एक तिसरा वर्ग १ चा अधिकारी कारवाईच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या वर्षभरात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तीन अभियंते लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले आहेत, हे विशेष!