शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लैंगिक शोषण प्रकरणात आणखी तीन संशयित व्यक्तींची नावे आली पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

घरकाम करणाऱ्या आदिवासी अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी आरोपींनी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. ही बाब वैद्यकीय चाचणीनंतर लक्षात आल्याने व प्रसार माध्यमातून हे प्रकरण गाजल्याने शासनाच्या वतीने कोरची पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात २३ ऑगस्ट २०२० ला भादंवि कलम ३७६ (२)(जे) तसेच पोस्को कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणारा कोण? बाळाचा खरा बाप शोधण्याचे आव्हान

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : एका अल्पवयीन आदिवासी युवतीचे लैंगिक शोषण करून तिच्यावर मातृत्व लादल्याप्रकरणी एका व्यावसायिकाला अटक झाली होती. त्या आरोपीची डीएनए चाचणी काही दिवसानंतर निगेटिव्ह आल्यानंतर जामिनावर सुटकाही झाली. आता या प्रकरणात आणखी तीन संशयितांची नावे पुढे आल्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली असून युवतीच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाचा खरा बाप कोण, हे शोधून काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.घरकाम करणाऱ्या आदिवासी अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी आरोपींनी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. ही बाब वैद्यकीय चाचणीनंतर लक्षात आल्याने व प्रसार माध्यमातून हे प्रकरण गाजल्याने शासनाच्या वतीने कोरची पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात २३ ऑगस्ट २०२० ला भादंवि कलम ३७६ (२)(जे) तसेच पोस्को कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणात आरोपी म्हणून किरण अग्रवाल या व्यावसायिकाला ऑगस्ट २०२० मध्येच अटक झाली होती. पण डीएनए चाचणीचा रिपोर्ट जुळत नसल्याने पोलीसही चक्रावून गेले. त्यामुळे तपासाची चक्रे पुन्हा सुरू झाली. दरम्यान या प्रकरणातील  पीडित युवतीने आणखी तीन संशयित व्यक्तींची नावे पोलिसांजवळ घेतली. त्यामुळे त्या तिघांपैकी बाळाचा खरा बाप कोण असावा, याबद्दल नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे. आता त्या तीन लोकांच्या डीएनए चाचणीनंतरच खर काय ते पुढे येणार आहे. त्या तीन संशयित लोकांना १७ फेब्रुवारीला कुरखेड़ाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी जयदत्त भवर यांनी ताब्यात घेतले. एवढेच नाही तर त्यांचे डीएनए नमुने चाचणीसाठी फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे. एसडीपीओ भंवर यांना विचारले असता, या प्रकरणातील पीडितेने नाव घेतलेल्या तीन संशयित व्यक्तींची चौकशी करून त्यांचे डीएनए नमुने चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले. त्यानंतर या तिघांना सूचनापत्र देऊन सोडल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरणी अजून कोणकोण आरोपी समोर येतात आणि बाळाचा खरा बाप कोण? याचा  शोध  लावण्यात पोलीस  यशस्वी  होतात  का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

सर्वावरच गुन्हा दाखल होणार?

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित युवतीने एका व्यावसायिकाचे नाव घेतले. तो एकमेव आरोपी आहे असे गृहित धरून पोलिसांनी कारवाई केली. मात्र डीएनए चाचणीच्या रिपोर्टनंतर पोलिसांनी पुन्हा युवतीला सखोल विचारपूस केली तेव्हा आणखी तीन जणांचे नावे पुढे आली. त्यामुळे पीडित युवतीचे शोषण एकापेक्षा जास्त आरोपींनी केल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणात आता चार आरोपी झाले आहेत. त्यापैकी ज्याच्याशी डीएनए जुळेल तो मुख्य आरोपी असला तरी इतर लोकांवरही लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा कायम राहू शकतो. प्रत्यक्ष पीडित मुलीनेच त्यांची नावे घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तूर्त पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा दाखल केलेला नाही.

 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिस