शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीस तीन महिन्यांचा कारावास

By admin | Updated: May 22, 2014 23:54 IST

कर्मचारी महिलेला रस्त्यात अडवून विनयभंग करणार्‍या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी ३ महिन्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव

गडचिरोली : कर्मचारी महिलेला रस्त्यात अडवून विनयभंग करणार्‍या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी ३ महिन्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव मोमीन सुबेदीन सिद्दीकी रा. गाझीयाबाद (उत्तरप्रदेश) असे आहे. प्राप्त माहितीनुसार, गाझीयाबाद येथील मोमीन सुबेदीन सिद्दीकी हा इसम गडचिरोली शहरात रस्त्याच्या कडेला कपडे विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक दिवसांपासून करीत होता. एका शासकीय कार्यालयातील कर्मचारी महिला कार्यालयातून आपल्या मुलासह घरी जात होती. दरम्यान मोमीन सिद्दीकी याने रस्त्यात तिचा हात पकडून अश्लील शिविगाळ करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. तत्काळ कर्मचारी महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मोमीन सिद्दीकी याला अटक करून त्याचेवर भादंविचे कलम ३५४, ३४१, २९४, ५०६ व ५०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू होता. आज गुरूवारी सदर प्रकरण न्यायालयात आले. यावेळी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अहिवडे यांनी उपरोक्त मामल्यात आरोपीला दोषी ठरवून त्याला ३ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या मामल्यात शासनातर्फे सरकारी वकील वि. दी. हुकरे यांनी बाजू मांडली. महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपी मोमीन सिद्दीकी याला गडचिरोली पोलिसांनी २० एप्रिल रोजी अटक केली होती. तेव्हापासून सदर आरोपी कारागृहात होता, हे विशेष. (स्थानिक प्रतिनिधी)