शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह तीन लाखांचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: May 25, 2017 00:37 IST

चारचाकी वाहनाने आरमोरी-गडचिरोली-चंद्रपूर मार्गाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी...

दोघांना अटक : एसडीपीओ कार्यालयाच्या पथकाची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चारचाकी वाहनाने आरमोरी-गडचिरोली-चंद्रपूर मार्गाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी बुधवारी चारचाकी वाहनासह अटक करून ३ लाख १६ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आरमोरी - गडचिरोली - चंद्रपूर या मार्गाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गडचिरोली-आरमोरी मार्गावर सापळा रचला. एक सफेद रंगाची कार संशयास्पद आढळून आल्याने तिचा पोलिसांनी पाठलाग केला. येथील कारगिल चौकात या कारला थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये ५९ हजार १०० रूपये किंमतीच्या मॅकडॉल नं. १ कंपनीच्या विदेशी दारूच्या १९७ निपा, ७ हजार २०० रूपये किंमतीच्या आॅफीस चाईस ब्ल्यू कंपनीच्या २४ निपा व एमएच-३१ डी.सी. १६१८२ क्रमांकाची ५० हजार रूपये किंमतीची सफेद रंगाची मारूती कंपनीची कार असा एकूण ३ लाख १६ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कारमधील हरदितसिंग सुरेंद्रसिंग गिल (२५), अमित कुमार आनंद सिंग (१८) दोन्ही रा. जरीपठका नागपूर यांना दारूबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली. सदर कारवाई गडचिरोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सिरसाठ, पोलीस हवालदार विजय राऊत, नायक पोलीस शिपाई दीपक डोंगरे, दोनाडकर आदींनी केली.सदर प्रकरणात गडचिरोली जिल्ह्याबाहेरून आरमोरी मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दारूची आयात होत होती. सदर कारवाईमुळे अवैध दारूपुरवठादार व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. आरमोरी व देसाईगंजच्या परिसरात अनेक छुपे मार्ग असल्याने रात्रीच्या सुमारास दारूची मोठ्या प्रमाणात आयात होते. पोलिसांचीही अडचण होते.