शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवणी येथे सापळा रचून तीन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:15 IST

वाहनातून अवैैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने चामोर्शी मार्गावरील शिवणी येथे सापळा रचून ३ लाखाच्या दारूसह ८ लाख किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल रविवारी रात्री जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. तर अन्य एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाची कारवाई : आठ लाख रूपये किमतीचे चारचाकी वाहनही घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाहनातून अवैैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने चामोर्शी मार्गावरील शिवणी येथे सापळा रचून ३ लाखाच्या दारूसह ८ लाख किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल रविवारी रात्री जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. तर अन्य एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला.राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोलीचे प्रभारी अधीक्षक पी. व्ही. गोतमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या पथकाने चामोर्शी मार्गावरील शिवणी येथे रविवारच्या रात्री सापळा रचला. याच सुमारास एमएच ३१ डीव्ही- २९३८ या क्रमांकाचे वाहन चामोर्शीकडून गडचिरोलीकडे रस्त्याने येताना दिसले. या वाहनाला पथकाने अडवून झडती घेतली असता, वाहनातून सुपर सॉनिक रॉकेट संत्रा ब्रँडच्या देशी दारूच्या ९० मिलीच्या एकूण ६० पेट्या (६ हजार बॉटल्या) अशी ३ लाख रूपयांची दारू आढळून आली. दारूसह आठ लाख रूपये किमतीचे टाटा कंपनीचे सुमो ग्रँड चारचाकी वाहन उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले. या प्रकरणी वाहनचालक रोहित सुधाकर बाबर रा. चिंतामणीनगरी ३ प्लॉट क्रमांक २५ ओमकारनगर बेसा रोड नागपूर याला अटक करून त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर एक इसम पसार होण्यास यशस्वी झाला. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.सदर कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस. एल. बोडेवार, जी. पी. गजभिये, एस. एम. गव्हारे, व्ही. पी. शेंदरे, व्ही. पी. महाकुलकर, एम. एम. कुळमेथे यांनी केली.