शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

थ्री-जी सेवेचा विस्तार रखडला

By admin | Updated: November 17, 2014 22:53 IST

स्मार्ट फोनच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आल्याने नागरिक स्मार्ट फोन खरेदी करीत आहेत. त्याचबरोबर थ्री-जी सेवेची मागणी वाढत चालली असतांनाच जिल्ह्यात मात्र

गडचिरोली : स्मार्ट फोनच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आल्याने नागरिक स्मार्ट फोन खरेदी करीत आहेत. त्याचबरोबर थ्री-जी सेवेची मागणी वाढत चालली असतांनाच जिल्ह्यात मात्र थ्री-जी सेवेचे विस्तारिकरण रखडले आहे. केवळ गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज व अहेरी या चारच ठिकाणी थ्री-जी सेवा कार्यरत आहे. उर्वरित आठ तालुक्यांमधील नागरिक मात्र थ्री-जी सेवेपासून वंचित आहेत. मोबाईल ही केवळ चैनीची वस्तू राहीलेली नसून अत्यावश्यक गरज बनली आहे. मोबाईल व इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ आले असून या दोन्ही साधनांमुळे कामात गतीमानता येण्याबरोबरच बराचसा खर्च कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांकडे मोबाईल दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे उत्पन्न इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असले तरी मोबाईलधारकांची संख्या मात्र निश्चितच कमी नाही. १८ वर्षांच्या युवकांपासून ते ८० वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाकडेच मोबाईल दिसून येतो. थ्री-जी सेवेचा वापर केवळ स्मार्टफोनमध्येच केला जातो. स्मार्टफोनची किंमत चार वर्षापूर्वी प्रचंड असल्याने सर्वसामान्य नागरिक सदर मोबाईल खरेदी करीत नव्हते. प्रत्येकाकडे साधे मोबाईलच आढळून येत होते. या मोबाईलचा वापर केवळ व्हाईस कॉल व मेसेज करण्यापुरताच मर्यादित होता. ही सेवा टू-जीच्या माध्यमातून उपलब्ध होते. मोबाईल कंपन्यांमध्ये असलेल्या तीव्र स्पर्धेमुळे स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड प्रमाणात कमी झाल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही स्मार्टफोनचा वापर करू लागला आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट समाविष्ट राहतो. इंटरनेट वेगाने काम करण्यासाठी थ्री-जी सेवा आवश्यक आहे. बीएसएनएलने गडचिरोली येथे चार वर्षापूर्वी थ्री-जी सेवा सुरू केली. त्यानंतर देसाईगंज, आरमोरी व अहेरी या चार शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने थ्री-जी सेवा सुरू केली आहे. सिरोंचा येथे मागील दोन वर्षांपासून थ्री-जी तंत्रज्ञान लावण्यात आले आहे. मात्र सदर सेवासुद्धा सुरू करण्यात आलेली नाही. आलापल्ली, चामोर्शी, सिरोंचा, कुरखेडा, आष्टी ही प्रगत असलेली शहरे आहेत. या शहरांमध्ये हजारो स्मार्टफोनधारक असून इंटरनेटचा वापर करतात. त्यामुळे या ठिकाणांसह कोरची, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा या तालुकास्थळावरील अनेक नागरिक स्मार्टफोनचा वापर करतात. या ठिकाणी थ्री-जी सेवा सुरू केल्यास याचा फायदा नागरिकांना होण्याबरोबरच बीएसएनएलचे उत्पन्न वाढीसही मदत होईल.उत्पन्न कमी असल्याचे कारण पुढे करीत खासगी मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या गडचिरोली जिल्ह्यात टॉवर उभारण्यास फारशा उत्सुक नाहीत. त्यामुळे इतर खासगी कंपन्यांचा कव्हरेज नसल्याने सर्वाधिक ग्राहक बीएसएनएलचेच आढळून येतात. बीएसएनएल ही सरकारी कंपनी असल्याने वेळप्रसंगी तोटा सहन करून नागरिकांना सेवा देणे बंधनकारक आहे. त्यानुसार बीएसएनएलचे ८६ टॉवर जिल्ह्यात कार्यरत आहेत. नवीन ३७ टॉवर उभारण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली असून सदर टॉवर एक वर्षाच्या आतमध्ये उभारले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या आणखी वाढण्यास मदत होईल. टॉवर बरोबरच थ्री-जी सेवेचाही विस्तार करण्याची मागणी जिल्ह्यातील मोबाईलधारकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)