शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेने वृक्षतोड थांबवून जप्त केले एफडीसीएमचे तीन ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:26 IST

कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर येथील ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी एफडीसीएमच्या मार्फत केली जाणारी वृक्षतोड थांबवून तीन ट्रॅक्टर शुक्रवारी जप्त केले आहेत.

ठळक मुद्देअवैध वृक्षतोडीचा आरोप : शिरपूर व भगवानपूर येथील नागरिक संतप्त

ऑनलाईन लोकमतवैरागड : कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर येथील ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी एफडीसीएमच्या मार्फत केली जाणारी वृक्षतोड थांबवून तीन ट्रॅक्टर शुक्रवारी जप्त केले आहेत.पेसा कायद्याअंतर्गत वने, वन्यजीव प्राणी व जैवविविधता यावर प्रतिकूल परिणाम करणारी कोणतीही कृती थांबविण्याचा ग्रामसभेला अधिकार आहे. मागील चार वर्षांपासून पेसा अंतर्गत येणाºया गावांच्या सीमेतील जंगलाची मोठ्या प्रमाणात तोड केली जात आहे. कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, सावलखेडा, वाढोणा, देसाईगंज तालुक्यातील चिखली रिठ, आरमोरी तालुक्यातील सालमारा, वैरागड या वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. नियामनुसार ज्या जंगलाची घनता ४० टक्के पेक्षा कमी आहे, अशा जंगलातील फक्त १० टक्के परिपक्व वृक्ष तोडण्याचा वन विकास महामंडळाला अधिकार असताना ज्या ठिकाणी वृक्षांची घनता सर्वाधिक आहे, अशा जंगलाची एफडीसीएमकडून १०० टक्के वृक्षतोड केली जात आहे. यामुळे संपूर्ण जंगल साफ होत आहे. विशेष म्हणजे मोह, बेहडा, चार, टेंभूूर या गौण वनोपजाची सरसकट कत्तल चालू असल्याने घनदाट जंगले ओसाड माडरान झाली आहेत.कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर येथील नागरिकांनी उपवनसंरक्षक देसाईगंज, आ. कृष्ण गजबे, तहसीलदार, पोलीस स्टेशन कुरखेडा यांना संपूर्ण गावकºयांच्या स्वाक्षरींचे निवेदन देऊन आम्ही एफडीसीएमची वृक्षतोड थांबवित आहोत, तरी आपण हजर राहावे, असे कळविले होते. नियोजनाप्रमाणे ९ मार्च रोजी शिरपूर व भगवानपूर येथील गावकºयांनी लाकडे वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. सदर ट्रॅक्टर ग्रामपंचायत शिरपूर येथे जमा करण्यात आले. नागरिकांमध्ये रोष दिसून येत होता.एफडीसीएम करत आहे जंगल सपाटनियमानुसार ४० टक्के कमी घनता असलेल्या जंगलातील फक्त १० टक्केच परिपक्व झालेले वृक्ष तोडण्याचा अधिकार एफडीसीएमला असताना वन विकास महामंडळ संपूर्ण वृक्षांची सरळसरळ कत्तल करून जंगल नष्ट करीत आहे. यावरून एफडीसीएम जंगलाचे संरक्षण करीत नसून जंगल नष्ट करण्याचे काम करीत आहे. यामध्ये मोठमोठ्या अधिकाºयांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रामकृष्ण कावळे, प्रेमदास गावडे, रवींद्र मडावी, लोकेश लोंढे, धनराज हलामी, होमराज मस्के यांनी केली आहे.नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीरपरिसरात असलेली मोह, टेंभूर, चार, बेहडा यासारखी झाडे स्थानिक नागरिकांनी संरक्षण करत वाढविली आहेत. याच झाडांवर आता एफडीसीएम आपला अधिकार सांगून सदर झाडे तोडीत आहे. ही झाडे आजपर्यंत स्थानिक नागरिकांना जवळपास चार महिने रोजगार उपलब्ध करून देत होती. मात्र एफडीसीएमने याच झाडांवर कुऱ्हाड चालविणे सुरू केले आहे. अत्यंत मौल्यवान व रोजगार देणारी झाडे एफडीसीएमतर्फे कापली जात आहेत. हे सर्व अवैध असताना एफडीसीएमचे अधिकारी मात्र नियमानुसारच झाडांची कत्तल करीत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे एफडीसीएमच्या कार्यप्रणालीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.