शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन एकरात फुलविली केळीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:38 IST

शेती व्यवसाय तोट्याचा म्हणून याकडे बहुतांश शेतकरी पाठ फिरवित असले तरी महत्त्वाकांक्षा, जिद्द व मेहनतीच्या बळावर शेतकरी तोट्यातील शेतीला आर्थिक उन्नतीचे साधन बनवू पाहत आहे.

ठळक मुद्देपारंपरिक व निर्वाहाच्या शेतीला बगल : बोडधाच्या शेतकºयाची उद्योगी शेती इतरांसाठी प्रेरणादायी

गोपाल लाजूरकर।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेती व्यवसाय तोट्याचा म्हणून याकडे बहुतांश शेतकरी पाठ फिरवित असले तरी महत्त्वाकांक्षा, जिद्द व मेहनतीच्या बळावर शेतकरी तोट्यातील शेतीला आर्थिक उन्नतीचे साधन बनवू पाहत आहे. याचेच एक अनोखे उदाहरण म्हणजे, आरमोरी तालुक्याच्या वडधा परिसरातील बोडधा गावचे शेतकरी तथा पोलीस पाटील शंकरराव संभाजी जवादे. शंकरराव जवादे यांनी तीन एकर शेतीत केळी लागवड करून इतरांना उद्योगी शेतीचा एक नवीन मूलमंत्र दिला आहे.शेतकरी शंकरराव जवादे यांना कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या ९ एकरच्या शेतीच्या तुकड्यात तीन एकरावर जानेवारी २०१७ मध्ये केळीची लावगड केली. तीन एकरासाठी केळीचे जी-९ टिशू कल्चरल वाण जळगाव येथून बोलाविले. ३ हजार ५०० रोपांची शेतीत लागवड केली. मशागतीसह लागवडीकरिता त्यांना जवळपास ३ लाख रूपयांवर खर्च आला. केळीच्या बागेनजीक बोअरद्वारे पाण्याची व्यवस्था केली. झाडांना पाणी करण्याकरिता त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. याकरिता त्यांना बराचसा पैसा खर्च करावा लागला. रोपांच्या सभोवताल चारही बाजूंनी शेवरी जातींची झाडे लावली आहेत. सध्या ही झाडे १५ ते २० फुटापर्यंत वाढली असून याद्वारे वादळ वाºयापासून केळीचे संरक्षण होत आहे. साडेतीन हजार झाडांपैैकी सध्या केळीची ३ हजार १५० झाडे जीवंत आहेत. १० महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच डिसेंबरपर्यंत केळीचे पीक निघणार आहे. यातून त्यांना २ लाख रूपये निव्वळ नफा अपेक्षित आहे. शंकरराव जवादे यांचे सुपुत्र सचिन जवादे हे या बागेची नियमित निगा राखत आहेत. तोट्याची शेती म्हणून शेतकºयांनी हताश न होता उद्योगी शेतीकडे वळावे, असे ते आनंदाने सांगतात.केळी पिकाची मशागत व देखभालकेळी पिकासाठी शेतकरी जवादे यांनी तीन एकराच्या जागेचे सपाटीकरण ट्रॅक्टरमार्फत केले. त्यानंतर तीन एकरात दहा ट्रॅक्टर शेणखत टाकून रोटावेटरने माती बारीक केली. एक ते दीड फूट उंच उभ्या पाळी तयार केल्या. त्यानंतर ५ बाय ५.५ फुटावर केळीची छोटी रोपे लावली. यावेळी बुरशीनाशकाचा वापर केला. उन्हाळ्यात चार दिवसाआड पाणी दिले. तसेच पोटॅश, युरिया, मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा, विद्राव्य खते नियमित दिली. त्यानंतर लागवडीपासून सात ते साडेसात महिन्यात केळीला घड आले. तीन एकरातील बागेत कचºयाची काढणी करण्यापासून ते रोपट्यांची निगा राखण्याचे काम शेतकरी कुटुंब करीत आहे.शेतकरी अद्यापही पारंपरिक शेतीच्या जोखडातून बाहेर पडला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक अथवा निर्वाहाची शेती तोट्याची आहे. त्यामुळे शेतकºयांनी व्यावसायिक शेतीकडे वळल्यास आर्थिक नफा अधिक मिळू शकतो. परंतु याकरिता पैेसा व मेहनतीचीही जोड आवश्यक आहे.- शंकरराव जवादे, शेतकरी तथा पोलीस पाटील, बोडधा