शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवनगरवासीयांना जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:46 IST

चामोर्शी मार्गावरील कैकाडी समाज वस्तीच्या मागील बाजुस देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ च्या बाजुला शासकीय जागेवर वस्ती करून राहत असलेल्या शिवनगरातील नागरिकांना माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी वस्ती रिकामी करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देकारवाई करण्याची मागणी : पत्रकार परिषदेत नागरिकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी मार्गावरील कैकाडी समाज वस्तीच्या मागील बाजुस देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ च्या बाजुला शासकीय जागेवर वस्ती करून राहत असलेल्या शिवनगरातील नागरिकांना माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी वस्ती रिकामी करण्याची मागणी केली. वस्ती रिकामी न केल्यास वस्तीवर बुलडोजर चालविण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप शिवनगरातील नागरिकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.शिवनगर येथील नागरिकांनी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. यानिमित्त ध्वज उभारण्यात आला होता. २३ एप्रिल रोजी अमिता मडावी या जवळपास ५० नागरिकांना सोबत घेऊन शिवनगरात आल्या. त्यांनी जयंतीनिमित्त लावलेल्या झेंड्याचा अवमान केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या प्रकरणी मडावी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.दोन दिवसात झोपडपट्टी रिकामी न केल्यास झोपेत बुलडोजर चालविण्याची धमकीही नागरिकांना दिली असल्याचा आरोप केला आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी व इतर अधिकारी माझ्या फोनवर आपली सर्व कामे सोडून माझे काम करतात, असा दम त्यांनी भरल्याचा आरोपही नागरिकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी शिवनगरातील महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.आपल्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली. घटनेच्या दिवशी वन विभागाचे अधिकारी, सर्वेअर व जमीन मालक उपस्थित होते. आपण कोणालाही शिविगाळ केली नाही किंवा ध्वजाचा अपमान केला नाही. शेतकऱ्यांना सातबारा मिळाला आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे पितळ उघडे पडल्याने असे आरोप करीत आहेत.- अमिता मडावी, गडचिरोली

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण