शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

कामगारांचे हजारो अर्ज बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:12 IST

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत पंचायत समिती सभागृहात व बाजार चौकातील सभागृहात २२ जुलै रोजी कामगार नोंदणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरादरम्यान काही अर्जांची नोंद न करताच ते सभागृहातच फेकून देण्यात आले.

ठळक मुद्देचामोर्शीतील प्रकार : कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत पंचायत समिती सभागृहात व बाजार चौकातील सभागृहात २२ जुलै रोजी कामगार नोंदणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरादरम्यान काही अर्जांची नोंद न करताच ते सभागृहातच फेकून देण्यात आले. हा गंभीर प्रकार असून या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे.नोंदणी शिबिराला तालुकाभरातील जवळपास पाच हजार कामगारांनी हजेरी लावली होती. कामगारांच्या तुलनेत नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने या ठिकाणी दिवसभर मोठा गोधळ उडाला होता. कामगार नोंदणीसाठी रांगा लावून अर्ज घेतले जात होते. कामगारांची वाढती संख्या लक्षात घेवून कामगारांकडून कर्मचाऱ्यांनी अर्ज जमा केले. दिवसभरात जेवढ्या कामगारांची नोंदणी झाली तेवढे अर्ज सोबत नेले. ज्या कामगारांची नोंदणी झाली नाही. ते अर्ज तिथेच टाकून संबंधित कर्मचारी चालले गेले. यात काही अपूर्ण माहिती असलेल्या अर्जांचा समावेश आहे. २४ जुलै रोजी सांस्कृतिक सभागृहात कामगार नोंदणी अर्जांचा खच अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आला. कामगार आपला अर्ज त्या गठ्यातून शोधत होते. कामगारांना कामगार नोंदणीसाठी लागलेल्या शुल्काची पावतीसुध्दा दिली नाही. असा आरोप कामगारांनी यावेळी केला आहे.नोंदणीसाठी सुमारे ५० किमी अंतरावरून काही कामगार आले होते. त्यांच्या नावाची नोंदणी न झाल्याने सदर कामगार परत गेले. मोठ्या परिश्रमाणे गोळा केलेले कागदपत्रेही नष्ट झाले. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे.