शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावर ग्राम पंचायती गोदरीमुक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2017 00:42 IST

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात वैयक्तिक शौचालयांचे १०० टक्के काम करणाऱ्या ....

१४४ ग्रा.पं. चे प्रस्ताव शासनाकडे सादर : पाच तालुक्यांत १०० टक्के शौचालयेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात वैयक्तिक शौचालयांचे १०० टक्के काम करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १४४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव ‘गोदरीमुक्ती गाव’ म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे एप्रिलमध्ये सादर केले. राज्यस्तरीय समितीमार्फत तपासणी झाल्यानंतर त्यातील किमान ११० वर ग्रामपंचायती गोदरीमुक्त होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेला देसाईगंज वगळता इतर ११ तालुक्यांसाठी एकूण ३४ हजार २४९ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने सन २०१६-१७ या वर्षासाठी दिले होते. यापैकी एप्रिल अखेरपर्यंत ११ तालुक्यात एकूण ३१ हजार २०२ शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र शासनाने देशातील व महाराष्ट्रातील सर्व शहरे व गावे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम आखून वैयक्तिक शौचालये मोठ्या प्रमाणात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या या निर्णयानुसार राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात ११ तालुक्यातील १५८ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तब्बल ३४ हजार २४९ शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट दिले. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने ३१ मार्च २०१७ पर्यंत उद्दिष्टानुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व शौचालयांचे काम १०० टक्के पूर्ण करावे, असा अल्टीमेटम शासनाने दिला होता. ३१ मार्च २०१७ पर्यंत १०० टक्के शौचालयांचे काम करण्यासाठी प्रशासनासह गावातील ग्रामसेवक व पदाधिकारीही सक्रिय झाले होते. त्यामुळे मार्च महिन्यात शौचालयांच्या बांधकामाने सर्वत्र वेग घेतला होता. मात्र शौचालयांचे १०० टक्के काम झाले नाही. त्यामुळे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी ३० एप्रिल २०१७ पर्यंत शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली. या तारखेपर्यंत भामरागड, चामोर्शी, धानोरा, गडचिरोली व कुरखेडा या पाच तालुक्यातील शौचालयांचे १०० टक्के काम पूर्ण केले. इतर सहा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी शौचालयाचे काम १०० टक्के पूर्ण केले. राज्यस्तरीय समितीतर्फे नोव्हेंबरमध्ये होणार गावांची तपासणीशौचालयाचे १०० टक्के काम पूर्ण करणाऱ्या १४४ ग्रामपंचायतीना गोदरीमुक्त गाव घोषित करण्यासाठी जि.प. प्रशासनाने एप्रिल २०१७ अखेर प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. सदर ग्रामपंचायतीच्या गावांची राज्यस्तरीय समितीमार्फत नोव्हेंबर महिन्यात तपासणी होणार आहे. त्या मुल्यांकनाअंती ११० वर ग्रामपंचायती गोदरीमुक्त घोषीत होतील असा विश्वास जि.प. प्रशासनाने व्यक्त केला आहे. सदर गावांमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. त्यामुळे या पंचायतींना पंचायत समिती व जिल्हास्तरावरील रोख पुरस्कार प्राप्त होणार आहे. गतवर्षी ४८ ग्रामपंचायती गोदरीमुक्त झाल्या होत्या.