शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

हजारो विद्यार्थी विद्यापीठावर धडकले

By admin | Updated: September 23, 2016 01:36 IST

विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात गुरूवारी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक

अभाविपचे नेतृत्व : ५५ मागण्यांचे निवेदन सादर; पाच किमी. पायी चालत गेले विद्यार्थी

गडचिरोली : विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात गुरूवारी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक ते गोंडवाना विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास पाच ते सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या घोषणांमुळे विद्यापीठाचा परिसर दणाणून गेला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मागील १५ दिवसांपासून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये जाऊन मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. गुरूवारी सकाळी गडचिरोली शहरातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काही शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली. दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. चंद्रपूरवरून जवळपास २५ ते ३० खासगी बसेसने विद्यार्थी आले होते. विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी मोर्चातील विद्यार्थी घोषणा देत होते. जवळपास एक किमी अंतरावर विद्यार्थ्यांची रांग लागली होती. उल्लेखनिय बाब म्हणजे, या मोर्चात विद्यार्थ्यांसमावेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारीही इंदिरा गांधी चौक ते विद्यापीठापर्यंत पायीच चालत गेले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांचा उत्साह प्रचंड दुणावलेला होता. या मोर्चात जवळजवळ सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले असावेत, असा दावा पोलीस प्रशासनानेही केला आहे.विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेदरम्यान अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे आवाहन केले. अन्यथा यापेक्षाही मोठा मोर्चा विद्यापीठावर काढला जाईल, असा इशारा सुध्दा दिला. मोर्चाचे नेतृत्व अभाविपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रघुवीर हंसराज अहीर, अभाविपचे प्रांत उपाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, अभाविपचे प्रांत सहमंत्री अक्षय जोशी, अभाविपचे नगरमंत्री हर्षल गेडाम, जिल्हा संयोजक सुभाष उप्पलवार, चंद्रपूर महानगर संघटनमंत्री सौरभ कावळे, अश्विनी भिसे, पल्लवी नरोटे, सुरेंद्र नाईक, आकाश सातपुते, गौरव होकम, युवराज सोनकुसरे, शुभम दयालवार, वैष्णवी डोंगर, राहूल टाकघर आदींनी केले. (नगर प्रतिनिधी)