शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

‘ते’ १३ वीज खांब देताहेत अपघातास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:16 IST

आरमोरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक विद्युत खांब रस्त्यावर असल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय महामार्गावर १३ विद्युत खांब असून हे खांब अपघातास निमंत्रण देत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : राष्ट्रीय महामार्गावरील तीन खांब तुटले; रात्रीच्या सुमारास धोक्याची शक्यता

विलास चिलबुले ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक विद्युत खांब रस्त्यावर असल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय महामार्गावर १३ विद्युत खांब असून हे खांब अपघातास निमंत्रण देत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.आरमोरी शहरात राष्ट्रीय महामार्गावरील बर्डी टी-पार्इंट ते नवीन बसस्थानक, स्टेट बँकेजवळ, भगतसिंग चौक तसेच बँक आॅफ इंडियाजवळ, जुना बसस्थानक, संत जगनाडे महाराज चौक ते साई मंदिरपर्यंत १३ विद्युत खांब अपघातास आमंत्रण देत आहेत. बर्डी ते साई मंदिर या परिसरातून राष्ट्रीय महामार्गावरून ओव्हरलोड ट्रक, महामंडळाच्या बसगाड्या, खासगी बसगाड्या तसेच लहान-मोठे मिळून दररोज शेकडो वाहने आवागमन करीत असतात. वाहनाच्या धडकेमुळे या मार्गावरील तीन खांब तुटले आहेत. अपघातामुळे उर्वरित खांब तुटण्याच्या मार्गावर आहेत.वीज खांबांमुळे भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर समस्येकडे महावितरण व स्थानिक नगर परिषद प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर आलेल्या या खांबांमुळे रस्ता अरूंद होत असून वाहनधारकांना आवागमन करताना या खांबांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात घडत आहेत.लोकमतने या समस्येबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने दोन ते तीनच वीज खांब रस्त्यावरून हटवून इतरत्र लावण्यात आले. यापूर्वी रात्री ट्रकच्या अपघातामुळे तीन खांब तुटले. मात्र यात जीवितहानी झाली नाहीप्रशासकीय यंत्रणा आंधळीआरमोरी शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध अनेक वीज खांब आहेत. हे खांब सर्व नागरिकांना दिसतात. मात्र प्रशासनाला दिसत नाही का, असा प्रश्न शहरातील नागरिकांपुढे उपस्थित होत आहे. अद्यापही १३ वीज खांब मार्गावर कायम असल्याने प्रशासकीय यंत्रणा आंधळी झाल्याचे वाटत आहे.येत्या सहा महिन्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार असल्यामुळे त्यांच्या मार्फत सदर खांब हटविण्यात येणार आहेत. मात्र जे खांब रस्त्याच्या मध्ये आलेले आहेत, असे खांब हटविण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणकडे संपर्क करून मार्गदर्शन घेण्यात येईल. शहराच्या मुख्य मार्गावरील वीज खांब हटविण्यात येईल.- हैदरभाई पंजवानी, उपाध्यक्ष, नगर परिषद, आरमोरी

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग